उपवासाचा डोसा बनतो कसा? पाहा झटपट बनणारी रेसिपी
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
उपवासाच्या दिवशी फराळाचं काय करायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्यासाठी ही खास रेसिपी ट्राय करू शकता.
वर्धा, 19 सप्टेंबर: सण, उत्सव म्हंटलं की उपवास आणि व्रतवैकल्य आलीच. उपवासाच्या दिवशी फराळाला काय करायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. साबुदाण्याची खिचडी, भगर हे पदार्थ घरोघरी बनवले जातात. पण, तुम्ही कधी भगरीपासून बनवलेला डोसा खाल्लाय का? या यंदा गणेशोत्सवात आणि इतर उपवासांच्या वेळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. वर्ध्यातल्या रुपाली जुवारे यांनी ही रेसिपी सांगितली आहे.
कसा कराल डोसा?
सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी कोरडी भगर आणि अर्धा वाटी साबुदाणा घ्या. त्यात चवीनुसार मीठ आणि साखर घालून बारीक करा. एका बाऊलमध्ये हे मिश्रण घेतल्यानंतर त्यात आवडत असेल तर दही आणि पाणी घालून नेहमीच्या डोस्याप्रमाणे पातळ करावे.
हे मिश्रण थोडा वेळ झाकून ठेवा. तोपर्यंत तुम्ही तुमच्या आवडीची चटणी बनवून घेऊ शकता.थोड्यावेळानं हे झाकून ठेवलेलं मिश्रण घेऊन नॉनस्टिक पॅनवर डोस्याप्रमाणे पसरवावे. त्यावर तेल लावावे. डोसा शिजल्यानंतर एकदा परतून रोल करून घेतल्यानंतर कुरकुरीत डोसा खाण्यासाठी तयार आहे.
advertisement
हा डोसां बनविण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक पॅन वापरला तर उत्तम. तुम्हाला आवडीची आणि उपवासाला चालेल ती चटणीही तुम्ही सर्व्ह करू शकता. भगरीचा हा डोसा घरातील चिमुकले आणि वृद्ध देखील आवडीने खातात त्यामुळे या श्रावणात उपवासाच्या फराळात ही रेसिपी नक्कीच ट्राय करा.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
September 19, 2023 2:52 PM IST