आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या मेथीचे घरीच बनवा भजे; पाहा सोपी रेसिपी पद्धत
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
मेथी ही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे .मेथीचे पकोडे कसे बनवले जातात पाहा
वर्धा, 16 सप्टेंबर : पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि अशा वातावरणात भजे किंवा पकोडे खाण्याचा वेगळाच आनंद असतो. त्यात मेथीचे बोंड म्हणजेच पकोडे विदर्भात मोठ्या आवडीने खाल्ले जातात. घरातील लहान मुलांसह वयोवृद्ध व्यक्ती देखील मेथीचे बोंड आवडीने खातात. मेथी ही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मेथीच्या अवघ्या दोन चमचे दाण्यांपासून अतिशय स्वादिष्ट असे पकोडे बनविले जातात. आपण वर्धा येथील गृहिणी वनिता राजमलवार यांच्याकडून टेस्टी मेथीचे पकोडे कसे बनवले जातात हे पाहणार आहोत.
सर्वप्रथम मेथीचे बोंडे बनवण्यासाठी अर्धी वाटी तांदूळ, दोन चमचे मेथीचे दाणे, एक ते दोन चमेच उडदाची डाळ, लाल तिखट, मीठ, हळद, तळण्यासाठी तेल, जिरे, ओवा, तीळ, कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, गव्हाचे पीठ आणि पाणी इत्यादी वस्तू लागतील. हे सगळं साहित्य योग्य प्रमाणात वापरून मेथीचे पकोडे तयार केले जातात.
advertisement
पावसाळ्यातच येते ही खास भाजी, तुम्ही कधी रेसिपी ट्राय केली का? PHOTOS
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये अर्धी वाटी तांदूळ, दोन चमचे मेथीचे दाणे आणि एक ते दोन चमचे उडदाची डाळ एकत्र करून धुवून घ्यावे. त्यानंतर कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या मध्ये शिजवून घ्यावे. मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, जीरे आणि शिजवलेलं मिश्रण मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. त्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये एकत्रित करून गव्हाच्या पिठामध्ये शिजवलेलं मिश्रण एकत्र फेटून घ्यावे. तेव्हा त्यात तीळ, ओवा आणि आलं-लसूणची पेस्ट, तिखट, हळद, धने पावडर, मीठ, जिरे पावडर घालावी. तुमच्या आवडीनुसार त्यात दही देखील घालू शकता.
advertisement
73 वर्षांपासून पुण्यात नंबर 1 आहे ‘ही’ मिसळ, पाहा काय आहे खासियत
छान एकत्रित झाल्यानंतर गरम तेलात पकोडे तळून घ्यावे. मंद आचेवर तळताना लालसर रंग येतपर्यंत तळावे. त्यानंतर गरमागरम पकोडे खायला तयार होतात. तर मग पाऊस सुरू असताना मेथीच्या अवघ्या 2 चमचे दाण्यांपासून झटपट बनवता येणारे हे स्वादिष्ट पकोडे नक्कीच ट्राय करा.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
September 16, 2023 7:53 PM IST