खान्देशी वांग्याचे भरीत बनवा घरीच, ही आहे अगदी सोपी रेसिपी

Last Updated:

जळगावातील अस्सल मेनूची सुरुवात होते ती भरताच्या वांग्यापासून. खान्देशात भरीतासोबत पारंपरिक खाद्य म्हणजे कळण्याची भाकरी खाल्ली जाते.

+
News18

News18

कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
जळगाव : जळगाव हे सोन्याच्या शुद्धतेसाठी तर जिल्हा कापूस आणि केळीच्या भांडारासाठी प्रसिद्ध आहे. खान्देशचा भाग असलेल्या जळगावकरांच्या जिभेचे चोचले पुरविणाऱ्या काही पदार्थांची चव लयभारी असते. त्यापैकीच जळगावातील अस्सल मेनूची सुरुवात होते ती भरताच्या वांग्यापासून. खान्देशात भरीतासोबत पारंपरिक खाद्य म्हणजे कळण्याची भाकरी खाल्ली जाते. बऱ्याच वेळा हिवाळ्यात भरीत पार्ट्या रंगतात तेव्हा कळण्याची भाकर आणि कोशिंबीर असा बेत असतो. विशेषतः पाहुणे मंडळी आल्यावर त्यांना भरीताचा आस्वाद आवर्जून देतात. याच भरीताची रेसिपी कशी करायची याबद्दल आपल्याला गृहिणी जागृती चौधरी यांनी माहिती दिली आहे
advertisement
गृहिणी जागृती चौधरी यांनी सांगितले की, भरीतासाठी कुठलेही वांगी चालतात. आपल्याकडे ज्या पद्धतीचे भरीताची वांगी आहेत त्यामध्ये सुद्धा आपण हे भरीत बनऊ शकतो. तसेच गरजेचे नाही की तुम्ही हे वांगी तूरकाठी वरच भाजणे. याला आपण गॅसवर सुद्धा भाजू शकतो. शहरात आता कोरड्या काड्या आणि चूल ह्या गोष्टी मिळणे मुश्किलेचे आहे. त्यामुळे वांग्याना तेल लाऊन त्याना सुरी अथवा चमच्याच्या माध्यमातून बारीक छिद्रे पडावे.
advertisement
जेणे करून तेल आतमध्ये जाऊन संपूर्ण वांगे हे आतून व्यवस्तीत भाजेल. याला आपल्या सोईनुसार गॅसवर किवा चुलीवर भाजू शकतो. यानंतर आपल्याला तिखट हवे असल्यास त्याप्रमाणे मिरच्यांचे वाटण करून घेणे. ह्या मिरच्या अगोदर पूर्ण लसूण पाकळी सोबत भाजून घेणे. वाटण व्यवस्तीत जाड बारीक झाल्यावर याचे रूपांतर झणझणीत ठेच्यात होते. त्यानंतर आपल्याला आवडत असल्यास खोबरे, कांद्याची पात, शेंगदाणे, कढीपत्ता, काजू ह्या गोष्टी भरीतात मिसळाव्यात. याने भरीताला आणखी चांगली चव येते.
advertisement
कसे बनवाल भरीत
सर्वात प्रथम गॅस अथवा चुलीवर कढई तापवत ठेवणे. कढाई गरम झाल्यास त्यात आपल्याला हवे त्यानुसार तेल टाकावे. त्यात जिरे मोहरीची फोडणी द्यावी. माघून त्यात शेंगदाणे, काजू तसेच कढीपत्ता सोडावा नंतर आपण ठेचलेली जाड मिरची आणि लसूण देखील यात फ्राय क्रून घेणे. किमान 5 मिनिटे सर्वांचा रंग बदलण्यास सुरवात झाल्यानंतर यात ठेचलेले मऊ भरीत वांगे सोडणे. हिरवी मिरचीचे वाटण आपण यात मीठा सोबत ठेचले असल्याने यात तिखट घालण्याची गरज नसते. परंतु आपण यात चवीनुसार मिठ घालावे. हे सर्व एकत्र करुन किमान 15 मिनिटे ह्यावर झाकण ठेऊन वाफेवर होऊ देणे. वांग्याना तेल सुटले की भरीताला वेगळीच चव भेटते. आपण भरीत सोलत असताना देखील वांग्यातून तेल येत असते हे तेल देखील आपण भरीतामध्ये सोडावे. 20 मिनिटात तुमचे खानदेशी स्पेशल भरीत बनून तयार होईल
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
खान्देशी वांग्याचे भरीत बनवा घरीच, ही आहे अगदी सोपी रेसिपी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement