उन्हाळा स्पेशल कैरीची डाळ चटणी, पारंपारिक पद्धतीने घरीच बनवा रेसिपी
- Published by:News18 Marathi
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
कैरीची डाळ चटणी ही एक अस्सल आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन उन्हाळी रेसिपी आहे. ही रेसिपी घरीच कशी बनवायची याबद्दल मुंबईतील गृहिणी माधुरी अंबुरे यांनी माहिती दिली आहे.
प्रियंका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : कैरीच्या चटणीचे अनेक प्रकार आपण जेवणासोबत खाल्ल्यास तोंडाची चव आणि भूक दोन्हीही दूर होतात. कच्च्या कैरीची चटणी ही खाण्यास अतिशय चविष्ट तर असतेच पण आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर असते. त्यातीलच एक प्रकार म्हणजे कैरीची डाळ चटणी ही एक अस्सल आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन उन्हाळी रेसिपी आहे. आपण उन्हाळा स्पेशल म्हणतो कारण कैरी म्हणजेच कच्चा आंबा उन्हाळ्यातच मिळतो. त्यामुळे ही रेसिपी घरीच कशी बनवायची याबद्दल मुंबईतील गृहिणी माधुरी अंबुरे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
कैरीची डाळ चटणी बनवण्यासाठी साहित्य
1 कैरी, 1 वाटी चना डाळ, 5-5 हिरव्या मिरच्या, सुखे खोबरे, आल, लसूण, कोथिंबीर, कडीपत्ता, हिंग, मीठ, मोहरी, जिरे हळद हे साहित्य लागेल.
नाश्त्याला बनवा रवा हांडवो डिश, एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल,PHOTOS
कैरीची डाळ चटणी बनवण्यासाठी कृती
प्रथम आपण चना डाळ 2/3 तास भिजवून घ्यावी. कैरीचे साल काढून, बारिक तुकडे करून मिक्सरमध्ये कैरी, लसूण, आल, कोथिंबीर कडीपत्ता, मिरच्या, खोबरे जिरे, मीठ घालून सर्व मिश्रण वाटून घ्यावे. त्यानंतर भिजवलेली डाळ पाणी काढून निथळून घ्यावी आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायची. यानंतर कैरी मिरचीचे वाटलेले मिश्रण थोडे मीठ घालून मिक्स करून त्या वर जिरे मोहरी, हिंग घालून तेलाची फोडणी घालावी. यानंतर आपली चटकदार, आंबट-तिखट डाळ कैरीची चटणी तयार होईल.
advertisement
ही चटणी चपाती किंवा भाकरी बरोबर पण तुम्ही खाऊ शकता. ही चटणी 3/4 दिवस फ्रिजमध्ये ठेवल्यास चांगली राहते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कैरीचा सिझन असल्याने असे वेगळ्या चटणीचा नक्की आस्वाद घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 30, 2024 4:02 PM IST