Kakdi Paratha Recipe: कधी काकडीचे पराठे खाल्ले का? झटपट आणि सोप्पी अशी संपूर्ण रेसिपी, Video

Last Updated:

अनेकदा काय होत की, काकडीचे पराठे तव्याला चिकटतात. त्यामुळे महिला ते बनवण्याचा कंटाळा करतात. पण, काही सोप्या टीप्स वापरून तुम्ही काकडीचे पराठे बनवू शकता. 

+
Cucumber

Cucumber Paratha

अमरावती: प्रत्येक गृहिणीला सकाळच्या नाश्त्याला काय बनवायचं? ही काळजी असतेच. नेहमी बनवतो ते पदार्थ खाऊन सुद्धा अनेकदा कंटाळा येतो. मग अशावेळी काहीतरी नवीन बनवायचं असतं. तेव्हा तुम्ही हेल्दी आणि टेस्टी असे काकडीचे पराठे बनवू शकता. काकडी आहारात घेतल्यास त्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे ही हेल्दी रेसिपी तुम्ही बनवू शकता. पण, अनेकदा काय होतं की, काकडीचे पराठे तव्याला चिकटतात. त्यामुळे महिला ते बनवण्याचा कंटाळा करतात. पण, काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही काकडीचे पराठे बनवू शकता. त्याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी मंदा बहुरूपी यांनी दिली आहे.
काकडीचे पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य 
किसलेली काकडी, गव्हाचे पीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक केलेली मिरची, हळद, मीठ, धने पावडर, कोथिंबीर, तेल हे साहित्य लागेल.
काकडीचे पराठे बनवण्याची कृती 
सर्वात आधी किसलेली काकडी घ्यायची. त्यात लागेल तेवढे गव्हाचे पीठ टाकून घ्यायचे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, जिरे टाकून घ्या. त्यानंतर मीठ, धने पावडर आणि हळद टाकून घ्या. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्या. त्यानंतर हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे. त्यात पाणी लागत असल्यास थोडे पाणी टाकून घ्या आणि योग्य मिश्रण तयार करून घ्या.
advertisement
त्यानंतर पराठे तयार करायला घेऊ शकता. यासाठी तुम्ही साधा तवादेखील वापरू शकता. असल्यास नॉनस्टिक पॅन सुद्धा वापरू शकता. तवा थोडा गरम होऊ द्यायचा आहे. त्यानंतर त्यावर थोडे तेल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मिश्रण तव्यावर टाकून ते पसरवून घ्यायचं आहे. नंतर पराठा एका साईडने पूर्ण शिजवून घ्यायचा आहे. एका साईडने शिजल्यानंतर पराठा परतवून घ्यायचा आहे.
advertisement
त्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा पराठा शिजवून घ्यायचा आहे. हेल्दी आणि टेस्टी असा पराठा तयार होईल. हा पराठा तुम्ही शेंगदाणा चटणी सोबत खाऊ शकता. काकडीचे पराठे बनवताना मिश्रणाची योग्य कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. त्याचबरोबर पराठा एका बाजूने पूर्ण शिजल्यानंतरच त्याला परतवून घ्यायचा आहे. या टिप्स वापरल्यास परफेक्ट असे काकडीचे पराठे तयार होतात.
मराठी बातम्या/रेसिपी/
Kakdi Paratha Recipe: कधी काकडीचे पराठे खाल्ले का? झटपट आणि सोप्पी अशी संपूर्ण रेसिपी, Video
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement