Upwaas Thali: एक-दोन नाही तर एकाच थाळीत 12 पदार्थ, ठाण्यात इथं श्रावणातील उपवास वाटेल परिपूर्ण
- Published by:Vrushali Kedar
- local18
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
या ठिकाणी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील पारंपरिक चव असलेले पदार्थ चाखायला मिळतील. सध्या या ठिकाणी उपवास स्पेशल थाळी देखील मिळत आहे.
ठाणे: सध्या श्रावण हा मराठी महिना सुरू आहे. हिंदू धर्मामध्ये श्रावणाला अतिशय पवित्र मानतात. या महिन्यात विविध धार्मिक गोष्टींचे पालन केले जाते. बहुतांशी लोक श्रावणात शाकाहारी जेवणाला प्राधान्य देतात. काहीजण तर शंकराचे आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास देखील करतात. अशा स्थितीमध्ये बाहेर जेवण्याचे पर्याय कमी असतात, असं वाटतं. मात्र, ठाण्यामध्ये शाकाहारी आणि उपवासकरूंसाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. या व्हेज रेस्टॉरंटमध्ये अतिशय चविष्ट जेवण मिळत आहेत.
'मेतकूट' असं या रेस्टॉरंटचं नाव असून श्रावणासाठी हे ठिकाण अतिशय परिपूर्ण आहे. या ठिकाणी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील पारंपरिक चव असलेले पदार्थ चाखायला मिळतील. सकाळी न्याहारीसाठी मिळणाऱ्या डिशेस केवळ 60 रुपयांपासून सुरू होतात. त्यामुळे हे रेस्टॉरंट खिशालाही परवडणारं आहे.
advertisement
सध्या या ठिकाणी उपवास स्पेशल थाळी देखील मिळत आहे. या थाळीत एक-दोन नव्हे तर तब्बल 12 उपवासाचे पदार्थ दिले जातात. ही थाळी चविष्ट आणि पोषणमूल्ये असलेल्या पदार्थांनी भरलेली असून उपवास करणाऱ्यांना परिपूर्ण जेवणाचा अनुभव देते. या थाळीतील सर्व पदार्थ उपवासाच्या नियमांनुसार तयार केलेले असून, त्यात चव आणि सात्विकता यांचा सुंदर मिलाफ आहे. त्यामुळे उपवासाच्या दिवशीही भरपेट आणि स्वादिष्ट जेवणाची सोय येथे होते.
advertisement
उपवास स्पेशल थाळीतील पदार्थ
view commentsराजगिरा पुरी, साबुदाणा खिचडी, दहीवडा, शेंगदाणा आमटी, रताळ्याचा किस, उपवासाचे थालीपीठ, बटाट्याची भाजी, उपवासाची कचोरी, सॅलड, ताक, उपवास चटणी, गोड पदार्थ (श्रावण स्पेशल शिरा किंवा खीर) इत्यादी पदार्थांच्या या उपवास स्पेशल थाळीमध्ये समावेश होतो. ठाणे रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला फक्त 10 मिनिटांवर घंटाळी मंदिर रोड येथे 'मेतकूट' हे रेस्टॉरंट आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 04, 2025 4:17 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Upwaas Thali: एक-दोन नाही तर एकाच थाळीत 12 पदार्थ, ठाण्यात इथं श्रावणातील उपवास वाटेल परिपूर्ण

