Shravan Upvas Recipe: उपवासाला काहीतरी वेगळं हवंय? बनवा रताळ्याच्या कापांची रेसिपी, खायला चविष्ट, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
कमी वेळात, कमी साहित्य वापरून, झटपट तयार होणारी पण चविष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी हवी असेल, तर रताळ्याचे काप हे एकदम परफेक्ट पर्याय ठरू शकतात.
मुंबई: सणासुदीचा काळ सुरू झाला की उपवासदेखील आलाच. त्याचबरोबर रोज नवनवीन पदार्थांची शोधाशोध सुरू होते. परंतु बहुतांश वेळा उपवासाचं खाणं ठरलेलं असतं. शाबूदाण्याची खिचडी, शाबूदाणे वडे, थालीपीठ किंवा दही-फळं. काही दिवसांनी याच चवींचा कंटाळा येतो आणि मग वाटतं आज काहीतरी वेगळं खावं. अशा वेळी अगदी कमी वेळात, कमी साहित्य वापरून, झटपट तयार होणारी पण चविष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी हवी असेल, तर रताळ्याचे काप हे एकदम परफेक्ट पर्याय ठरू शकतात.
कुरकुरीत, झणझणीत आणि घरच्या घरी सहज बनवता येणारे हे काप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील. यासाठी लागणारं साहित्यही अगदी साधं आहे.
रताळ्याचे काप बनवण्यासाठी साहित्य:
2 मध्यम आकाराची रताळी, अर्धा वाटी शाबुदाण्याचे पीठ,सेंद्रिय सैंधव मीठ (चवीनुसार) तूप किंवा शेंगदाण्याचं तेल तळण्यासाठी हे साहित्य लागेल.
advertisement
रताळ्याचे काप बनवण्याची कृती
रताळी सोलून पातळ गोल काप कापून घ्या.
मध्यम शिजवून घ्या.
तव्यावर थोडं तूप/तेल गरम करा.
रताळ्याच्या कापाच्या दोन्ही बाजूला शाबुदाण्याचे पीठ लावा.
तव्यात सोडून रताळ्याचे काप मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्या.
आपले गरम गरम कुरकुरीत काप उपवासासाठी तयार आहेत. उपवासाच्या पथ्यावर पडणारी, झटपट तयार होणारी आणि चवीलाही समृद्ध अशी ही रेसिपी, यंदा नक्की ट्राय करा. सणाच्या गडबडीत असा झटपट आणि स्वादिष्ट पर्याय खूपच उपयोगी पडतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 04, 2025 11:06 AM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Shravan Upvas Recipe: उपवासाला काहीतरी वेगळं हवंय? बनवा रताळ्याच्या कापांची रेसिपी, खायला चविष्ट, Video

