उन जरा जास्त आहे, मग हे प्यायलाचं पाहिजे! घरीच तयार करा झटपट रेसिपी

Last Updated:

आंब्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिश तयार करत असतो किंवा पेय तयार करत असतो. तर आंब्यापासून झटपट असे सरबत कसे करायचे? याबद्दलचं गृहिणी मेघना देशपांडे यांनी रेसिपी सांगितली आहे. 

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा सुरू आहे. उन्हाळा म्हणलं की आंब्याचा सिझन आलाचं. आंब्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिश तयार करत असतो किंवा पेय तयार करत असतो. तर आंब्यापासून झटपट असे सरबत कसे करायचे? याबद्दलचं गृहिणी मेघना देशपांडे यांनी रेसिपी सांगितली आहे.
सरबतासाठी लागणारे साहित्य
उकडलेल्या कैरीचा गर, पिकलेल्या आंब्याच्या फोडी, थोडी साखर, भिजवलेल्या सब्जा बी, वाळलेली पुदिन्याची पाने, चाट मसाला, काळे मीठ, मिरचीचे काप आणि आले हे एवढे साहित्य लागेल.
 सरबत करण्यासाठी कृती 
सरबत तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये उकडलेल्या कैरीचा गर घालायचा. त्यानंतर पिकलेल्या आंब्याच्या फोडी घालायच्या. त्यामध्ये चवीनुसार साखर टाकायची. चाट मसाला, आले आणि मिरचीचे काप टाकायचे. त्यानंतर त्यामध्ये वाळलेली पुदिन्याची पाने टाकायची किंवा तुम्ही ताजा पुदिना देखील यामध्ये टाकू शकता. सगळ्यात शेवटी चवीनुसार काळे मीठ त्यामध्ये ऍड करायचं. हे सर्व साहित्य मिक्सरमधून चांगल्या पद्धतीने बारीक करून घ्यायचे.
advertisement
हे सर्व साहित्य एकदा बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचे. पाणी हे तुम्हाला हवे तेवढे पाणी त्यात तुम्ही टाकू शकता. आणि पाणी टाकल्यानंतर परत एकदा त्याला चांगले बारीक करून घ्यायचे. अशा पद्धतीने हे सरबत तयार होते. हे सर्व करण्यासाठी थोडेसे बर्फाचे तुकडे त्यामध्ये टाकायचे. तर या उन्हाळ्यामध्ये हे झटपट तयार होणारे सरबत नक्की एकदा ट्राय करा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
उन जरा जास्त आहे, मग हे प्यायलाचं पाहिजे! घरीच तयार करा झटपट रेसिपी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement