Khekda Bhaji Recipe : गरमागरम बनवा खेकडा भजी, अशा पद्धतीने बनतील खुसखुशीत, रेसिपीचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
आज आपण खेकडा भजी अगदी बाजारात मिळतात तशाच खुसखुशीत आणि चविष्ट पद्धतीने घरच्या घरी बनवणार आहोत.
पुणे : थंडीच्या दिवसात काहीतरी गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा अनेकांची होत असते. म्हणूनच आज आपण खेकडा भजी अगदी बाजारात मिळतात तशाच खुसखुशीत आणि चविष्ट पद्धतीने घरच्या घरी बनवणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सोपी रेसिपी.
खेकडा भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य
कांदे हिरवी मिरची ,आलं , लसूण , कोथिंबीर सोडा तेल, तांदळाचे पीठ , हरभरा डाळीचे पीठ, मीठ चवीनुसार हे साहित्य लागेल.
खेकडा भजी कृती
सुरुवातीला कांदा उभा चिरून घ्या. त्यात मीठ ॲड करा आणि अर्धा तास तसेच ठेवून द्या, त्यामुळे कांद्याला पाणी सुटेल. आता हिरवी मिरची, आलं, लसूण, धणे आणि जीरे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. अर्ध्या तासानंतर सुटलेल्या कांद्याच्या पाण्यात ही वाटण, बारीक चिरलेली कोथिंबीर, तांदळाचे पीठ आणि थोडे बेसन घालून मिक्स करा.
advertisement
बेसन फक्त बाइंडिंगसाठी लागेल इतकेच घालायचे. मिश्रण खूप कोरडे वाटल्यास थोडे पाणी घाला.यानंतर 2 टेबलस्पून तेलाचे मोहन आणि पाव टीस्पून खायचा सोडा घालून नीट मिसळा. तेल गरम झाल्यावर मध्यम आकाराचे भजी मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. कुरकुरीत खेकडा भजी तयार आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 10, 2025 7:09 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Khekda Bhaji Recipe : गरमागरम बनवा खेकडा भजी, अशा पद्धतीने बनतील खुसखुशीत, रेसिपीचा Video










