Alivachi Kheer : हिवाळ्यात आरोग्यासाठी पौष्टिक, घरीच बनवा अळीवची खीर, रेसिपीचा संपूर्ण Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
नेहमीचा स्वाद कंटाळवाणा वाटत असेल तर पौष्टिक अळीवची खीर नक्की करून पहा. अळीव हा हिवाळ्यात खास उपयुक्त मानला जातो.
मुंबई : हिवाळा सुरु होताच घराघरात तांदूळ किंवा शेवयांची गरमागरम खीर बनवली जाते. पण नेहमीचा स्वाद कंटाळवाणा वाटत असेल तर पौष्टिक अळीवची खीर नक्की करून पहा. अळीव हा हिवाळ्यात खास उपयुक्त मानला जातो. तो शरीरात उष्णता निर्माण करतो, ताकद वाढवतो आणि दिवसाची सुरुवात ऊर्जेने भरलेली ठेवतो. चला तर लगेच जाणून घ्या ही सोपी पण अत्यंत आरोग्यदायी रेसिपी.
अळीव खीर साहित्य
अळीव (Halim seeds) – 2 टेबलस्पून
दूध – 2 कप
गुळ – 2–3 टेबलस्पून (चवीनुसार)
तूप – 1 टीस्पून
वेलचीपूड – ¼ टीस्पून
बदाम/काजू/मनुका – 1–2 टेबलस्पून (ऐच्छिक)
अळीव खीर कृती
advertisement
अळीव भिजवणे: अळीव धुऊन 5 मिनिटे कोमट पाण्यात भिजवून ठेवा. भिजल्यावर ते फुलून जेलसारखे होते.
दूध गरम करणे: एका भांड्यात दूध गरम करून उकळी येऊ द्या. हवं असल्यास तूप घालून हलक्या आचेवर ढवळा.
अळीव घालणे: उकळत्या दुधात भिजवलेले अळीव घाला. हळूहळू ढवळत ५–७ मिनिटे शिजू द्या. मिश्रण घट्ट होत जाईल.
advertisement
गोडवा आणि चव: साखर किंवा गुळ घालून नीट मिसळा. नंतर वेलचीपूड आणि सुके मेवे घाला. मग दूध घाला.
सर्व्हिंग: गरमागरम सर्व्ह करा. हिवाळ्यासाठी अतिशय पौष्टिक आणि उर्जादायी खीर.
अळीव खीरचे फायदे
शरीरात उष्णता निर्माण करते.
कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन भरपूर.
महिलांसाठी विशेषतः उपयुक्त.
हिवाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 10, 2025 3:36 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Alivachi Kheer : हिवाळ्यात आरोग्यासाठी पौष्टिक, घरीच बनवा अळीवची खीर, रेसिपीचा संपूर्ण Video









