उन्हाळ्यात जेवणासोबत काही तरी थंड हवं! मग घरीच बनवा स्पेशल कोशिंबीर VIDEO

Last Updated:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्णता वाढल्यामुळे सहाजिकच भूक मंदावते. अशावेळी जेवणासोबत खाण्यासाठी घरातीलच साहित्याच्या मदतीने अत्यंत सोप्या पद्धतीने घरच्या घरी कोशिंबीर तयार करता येते.

+
कोशिंबीर

कोशिंबीर

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्णता वाढल्यामुळे सहाजिकच भूक मंदावते. त्यामुळे अनेक जण जीवन कमी आणि थंड पेय जास्त प्रमाणात घेतात. परंतु उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार घेणेदेखील तेवढेच आवश्यक असतं. यामुळे आपल्या जीवनामध्ये काही पदार्थांचा समावेश करून आपण आपली भूक वाढवू शकतो. यापैकीच कोशिंबीर हा एक अत्यंत चांगला पर्याय आहे. घरातीलच साहित्याच्या मदतीने अत्यंत सोप्या पद्धतीने घरच्या घरी कोशिंबीर तयार करता येते. पाहुयात जेवणाची लज्जत वाढवणारी कोशिंबीर घरच्या घरी कशी तयार करावी.
advertisement
कोशिंबीर बनवण्यासाठी साहित्य
कोशिंबीर तयार करण्यासाठी एक मोठा आकाराचा कांदा, एक टोमॅटो, एक मध्यम आकाराची काकडी, एक मध्यम आकाराचे गाजर आणि दोन हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, वाटीभर दही, आवश्यकतेनुसार मीठ आणि साखर इत्यादी साहित्याची आवश्यकता कोशिंबीर तयार करण्यासाठी असते.
advertisement
कोशिंबीर बनवण्यासाठी कृती
सर्वप्रथम कांदा, काकडी, गाजर, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर इत्यादी साहित्य चाकूच्या सहाय्याने अत्यंत बारीक कापून घ्यावे. यानंतर वाटीभर दही व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. या दह्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि आवश्यकतेनुसार साखर घालावी. हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. यानंतर चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व साहित्य या मिश्रणात घालावे. हे सर्व मिश्रण चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घ्यावे. यानंतर अर्ध्या तासापर्यंत फ्रीजमध्ये ठेवावे.
advertisement
अर्धा तास व्यवस्थित मॅरीनेट झाल्यानंतर जेवणाबरोबर घरातील सदस्यांना आपण अत्यंत स्वादिष्ट अशी कोशिंबीर सर्व्ह करू शकतो. यामुळे घरातील सदस्य भरपूर जेवतील. ज्यामुळे त्यांना सर्व पोषक तत्वे मिळून शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होईल. तेव्हा तुम्ही देखील ही सोपी रेसिपी घरच्या घरी नक्की ट्राय करा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
उन्हाळ्यात जेवणासोबत काही तरी थंड हवं! मग घरीच बनवा स्पेशल कोशिंबीर VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement