Manchurian Recipe : तेलकट नाही, टेस्टी हवंय! घरच्या घरी बनवा स्वादिष्ट मंचुरियन, संपूर्ण रेसिपी Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
चायनीज भेळ मंचुरियनच्या गाड्या हे अनेकांच्या संध्याकाळच्या खाण्याचे आवडते ठिकाण बनले आहे. मात्र अलीकडे या गाड्यांवर मिळणारे मंचुरियन अतिशय तेलकट, वारंवार वापरलेल्या तेलात तळलेले आणि कधी कधी स्वच्छतेच्या निकषांपासून दूर असल्याचे आढळून आले आहे.
मुंबई : शहरात जागोजागी दिसणाऱ्या रोडसाइड चायनीज भेळ मंचुरियनच्या गाड्या हे अनेकांच्या संध्याकाळच्या खाण्याचे आवडते ठिकाण बनले आहे. मात्र अलीकडे या गाड्यांवर मिळणारे मंचुरियन अतिशय तेलकट, वारंवार वापरलेल्या तेलात तळलेले आणि कधी कधी स्वच्छतेच्या निकषांपासून दूर असल्याचे आढळून आले आहे. यामुळे अनेकांना ॲसिडिटी, पोटात जळजळ आणि अपचनासारख्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. याच समस्यांचा विचार करून आज आपण स्वादिष्ट मंचुरियन घरच्या घरी कसे तयार करता येईल ते बघणार आहोत.
लागणारे साहित्य (कमी आणि अगदी साधे)
अर्धा कप किसलेली कोबी (5 ते 6 जणांसाठी)
1 छोटा गाजर किसलेला (इच्छेनुसार)
मोठी वाटी मैदा / गव्हाचे पीठ
छोटी वाटी कॉर्नफ्लोअर
कोथिंबीर थोडीशी
मिरची- 2-3 बारीक चिरलेल्या
मीठ चवीनुसार
लाल मिरची पावडर — ½ टीस्पून
हळद-½ टीस्पून
तळण्यासाठी कमी तेल / एअर फ्राय
मंचुरियन बनवण्यासाठी क्रिया
किसलेली कोबी आणि गाजर मोठ्या भांड्यात घ्या. त्यातील अतिरिक्त पाणी असेल तर हलकेच दाबून काढा.
advertisement
या भाज्यांत मैदा, कॉर्नफ्लोअर, कोथिंबीर, मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर टाका. थोडे पाणी घालून सगळं एकसारखं मिसळून घट्ट मिश्रण तयार करा. आता छोटे-छोटे गोळे तयार करा.
बॉल्स फाटत नाहीत ना हे पाहा. फाटत असतील तर थोडा मैदा/कॉर्नफ्लोअर वाढवा.
advertisement
तळण्याची अंतिम प्रक्रिया: शॅलो फ्राय किंवा एअर फ्राय करा. नाहीतर गरम तेलात बॉल्स टाका आणि हलक्या आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा. बाहेर काढून टिश्यूवर ठेवा म्हणजे अतिरिक्त तेल निघून जाईल.
टीप: हे मंचुरियन तुम्ही ग्रेव्हीमध्ये टाकून सुद्धा खाऊ शकता किंवा सॉस, घरगुती शेजवान चटणीसोबत देखील खाऊ शकता.
आता घरच्याघरी, स्वच्छतेत, कमी तेलात आणि कमीत कमी साहित्यात वापरून स्वादिष्ट मंचुरियन नक्की बनवा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 5:46 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Manchurian Recipe : तेलकट नाही, टेस्टी हवंय! घरच्या घरी बनवा स्वादिष्ट मंचुरियन, संपूर्ण रेसिपी Video

