advertisement

Oscar पर्यंत पोहोचलेले 5 भारतीय चित्रपट, दोघांनी जिंकली ट्रॉफी; 3 रिकाम्या हाताने परतले

Last Updated:
2026 च्या ऑस्करमध्ये 'सिनर्स' आणि 'वन बॅटल आफ्टर अदर' सारख्या चित्रपटांनी बाजी मारली. 'वन बॅटल आफ्टर अदर' या चित्रपटाने यावर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला. यावर्षी होमबाउंड हा भारताकडून गेलेला अधिकृत चित्रपट होता, परंतु ईशान खट्टर आणि विशाल जेठवा अभिनीत चित्रपट शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळवू शकला नाही.
1/9
नीरज घायवान दिग्दर्शित, होमबाउंड हा यावर्षी ऑस्करसाठी भारताचा अधिकृत चित्रपट होता. हा चित्रपट टॉप 15 मध्ये पोहोचला परंतु टॉप 5 नॉमिनेशनमध्ये स्थान मिळवू शकला नाही. होमबाउंडचा ऑस्कर प्रवास 22 जानेवारी रोजी संपला.

2/9
गेल्या वर्षी किरण रावचा 'लापता लेडीज' हा चित्रपट अकादमी पुरस्कारांसाठी भारताचा अधिकृत चित्रपट होता, परंतु त्या वर्षीही, भारताचे ऑस्कर जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. हे दोन्ही चित्रपट नॉमिनेशनपर्यंत पोहोचलेही नाहीत. भारतीय सिनेमांबरोबर असं पहिल्यांदाच झालं नाही. याआधीही  भारतीय चित्रपटांना ऑस्कर नामांकन मिळाले पण ते जिंकण्यात कमी पडले.

3/9
 भारतीय चित्रपटसृष्टीत सुवर्ण अक्षरांनी कोरलेल्या 'मदर इंडिया' या कल्ट क्लासिकबद्दल बोलूया. दिग्दर्शक मेहबूब खान यांचा चित्रपट 1958 मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत नॉमिनेट झाला होता. ऑस्कर नॉमिनेशन गाठणारा हा पहिला भारतीय चित्रपट होता. परंतु केवळ एका मताने हुकला.

4/9
नर्गिस, सुनीता दत्त आणि राजेंद्र कुमार अभिनीत हा चित्रपट 1958  मध्ये भारताची अधिकृत एन्ट्री होती. मेहबूब खान दिग्दर्शित या चित्रपटाचे जगभरातील समीक्षकांनी खूप कौतुक केले. भारतात त्याला अनेक पुरस्कार मिळाले. परंतू ऑस्कर जिंकण्याच्या जवळ येऊनही तो जिंकू शकला नाही.

5/9
मीरा नायर इतिहास घडवण्याच्या जवळ होत्या. 1988 मध्ये 'सलाम बॉम्बे' या चित्रपटाने ऑस्कर नॉमिनेशन मिळवलं. 'सलाम बॉम्बे' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत  नॉमिनेट झाला.

6/9
25 वर्षांपूर्वी 2001 मध्ये आशुतोष गोवारिकर यांच्या 'लगान' चित्रपटाला भारतातील समीक्षक आणि प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली. या चित्रपटाला व्यावसायिक यश आणि समीक्षकांची प्रशंसा दोन्ही मिळाली. 2002 मध्ये तो सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट श्रेणीत नॉमिनेट झाला. आमिर खान आणि ग्रेसी सिंग अभिनीत हा चित्रपट भारत आणि ब्रिटिशांमधील युद्धावर आधारित होता.

7/9
1982 मध्ये आलेल्या 'गांधी' चित्रपटाला केवळ एक नव्हे तर अनेक श्रेणींमध्ये ऑस्कर मिळाला. हा चित्रपट पूर्णपणे भारतीय नव्हता. 'गांधी' चित्रपटाचे दिग्दर्शन इंग्लंडचे रहिवासी रिचर्ड अ‍ॅटनबरो यांनी केले होते. बेन किंग्सले यांनी चित्रपटात गांधींची मुख्य भूमिका साकारली होती. 1983 मध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत ऑस्कर मिळाला होता. या चित्रपटात महात्मा गांधींची भूमिका करणारे मुख्य अभिनेता बेन किंग्सले यांनीही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत ऑस्कर जिंकला होता.

8/9
'गांधी' मध्ये भारतीय अभिनेते अमरीश पुरी आणि रोहिणी हट्टंगडी यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. भारतीय डिझायनर भानू अथैया यांनी चित्रपटाच्या पोशाख डिझाइनसाठी ऑस्कर जिंकला आणि ऑस्कर जिंकणारे ते पहिले भारतीय ठरले.

9/9
दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस यांच्या 'द एलिफंट व्हिस्परर'ला 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट शॉर्ट फिल्म श्रेणी मिळाली. भारतीय चित्रपटांनी केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली मजबूत उपस्थिती प्रस्थापित केली आहे.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement