Masala Tea: पाऊस सुरू झाला की गरमा गरम चहा झालाच पाहिजे, बाहेर कुठं जाताय? घरीच बनवा स्पेशल रेसिपी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
चहा आणि पाऊस हे नातं अतिशय जवळच आहे. पाऊस पडल्यानंतर वातावरणात काहीसा गारवा निर्माण होतो. त्यांनतर अनेकांना चहा पिण्याची इच्छा होते. पण, पाऊस सुरू असताना साधा चहा पिण्यापेक्षा मसाला चहा पिण्यात चहा प्रेमींना जास्त इंट्रेस असतो.
अमरावती: चहा आणि पाऊस हे नातं अतिशय जवळच आहे. पाऊस पडल्यानंतर वातावरणात काहीसा गारवा निर्माण होतो. त्यानंतर अनेकांना चहा पिण्याची इच्छा होते. पण, पाऊस सुरू असताना साधा चहा पिण्यापेक्षा मसाला चहा पिण्यात चहा प्रेमींना जास्त इंटरेस्ट असतो. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चहा मसाले उपलब्ध आहेत. पण, घरच्या मसाल्याची चव काही वेगळीच असते. तुम्ही किचनमधील काही मसाल्याच्या साहित्यापासून चहाचा मसाला तयार करू शकता. मसाला चहा आणि त्यासाठी लागणारा मसाला कसा बनवायचा? याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी जया भोंडे यांनी दिली आहे.
मसाला चहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
साखर, चहा पावडर, दूध, वेलची, कलमी, स्टार फुल, मिरे, सुंठ, लवंग, जायफळ हे साहित्य लागेल.
मसाला चहा बनवण्याची कृती
advertisement
सर्वात आधी मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी वेलची, लवंग, कलमी, स्टार फुल, मिरे, सुंठ, जायफळ हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करण्यासाठी मिक्सर किंवा मग खलबत्ता सुद्धा तुम्ही वापरू शकता. हे सर्व जिन्नस एकत्र बारीक करून घेतले की, चहाचा मसाला तयार होतो. मसाला तयार करण्यासाठी सर्व साहित्य हे सारख्या प्रमाणात घ्यायचे आहे. तुम्हाला यातील मिरे, लवंग यापैकी काही स्किप करायचे असल्यास तुम्ही करू शकता.
advertisement
मसाला तयार झाल्यानंतर चहा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी जेवढं दूध तेवढं पाणी घ्यायचं आहे. 1 कप दूध असेल तर 1 कप पाणी घेऊन त्यात तुम्हाला पाहिजे त्या अंदाजानुसार त्यात साखर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर चहा पावडर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर लगेच मसाला टाकून घ्यायचा आहे. मसाला सुद्धा तुम्ही चवीनुसार टाकू शकता.
advertisement
त्यानंतर चहा शिजवून घ्यायचा आहे. चहा शिजवण्यासाठी गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे. त्यानंतर चहाला 3 ते 4 उकळी काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर चहा तयार होईल. घरगुती साहित्यापासून तुम्ही चविष्ट आणि कडक असा चहा बनवू शकता.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
June 05, 2025 3:35 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Masala Tea: पाऊस सुरू झाला की गरमा गरम चहा झालाच पाहिजे, बाहेर कुठं जाताय? घरीच बनवा स्पेशल रेसिपी