Shevgyachya Panachi Bhaji: आरोग्यासाठी फायदेशीर, घरीच बनवा शेवग्याच्या पानांची भाजी, एकदम सोपी रेसिपी, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
मृग नक्षत्राला शेवग्याच्या पानांची भाजी करण्याची प्रथा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात आहे. शेवग्याच्या पानांची भाजी का? तर या पानांमध्ये भरपूर पोषणमूल्यं असतात.
सांगली: मृग नक्षत्राला शेवग्याच्या पानांची भाजी करून त्याचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. शेवग्याची भाजी बाजारात सर्रास विकत मिळत नाही, फार क्वचित दिसते. ही भाजी करायची असेल तर ती डायरेक्ट झाडावरूनच तोडावी लागते. शेवग्याच्या पानांमध्ये संत्र्यापेक्षा सातपट अधिक व्हिटॅमिन सी असते, गाजरापेक्षा चारपट अधिक व्हिटॅमिन ए असते, दुधापेक्षा चारपट अधिक कॅल्शियम असते, केळ्यापेक्षा तीनपट अधिक पोटॅशियम असते आणि दह्यापेक्षा दुप्पट प्रथिने असतात.
शेवग्याच्या पानांमधल्या पोषणमूल्यांचा विचार केला तर ही भाजी किती पौष्टिक आहे हे आपल्या लक्षात येते. शेवग्याच्या शेंगा जितक्या चवदार लागतात तितकी भाजी चवदार लागत नाही. मात्र योग्य पद्धतीने बनवली तर कडू देखील लागत नाही. शेवग्याच्या पानांची भाजी कशी बनवायची पाहुयात.
शेवग्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी साहित्य
ओंजळभर शेवग्याची कोवळी ताजी पाने, ओल्या खोबऱ्याचे वाटण, हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीप्रमाणे तेल, जिरे, मोहरी आणि मीठ हे साहित्य लागेल.
advertisement
शेवग्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी कृती
शेवग्याच्या पानांच्या भाजीसाठी शक्यतो ताजी, कोवळी पाने वापरावी. शेवग्याच्या छोट्या देठांसहित पाने खुडून, स्वच्छ धुवून घ्यावीत. नाजूक, कोवळी पाने असल्याने उकडून घेण्याची गरज नसते. कढईत तेल गरम करावे. जिरे, मोहरी, ओल्या खोबऱ्याचे वाटण, हिरव्या मिरचीचा ठेचा घालून चरचरीत फोडणी द्या. भाजलेल्या वाटणात भाजी टाकून घ्या. चवीनुसार मीठ आणि थोडेसे पाणी टाकून भाजी शिजवून घ्यावी. भाजी बनवण्याच्या अनेक पद्धतींपैकी ही सगळ्यात सोपी आणि पारंपरिक पद्धत ठरते. पावसाळ्यातले संसर्ग टळावेत आणि तब्येत चांगली राहावी यासाठी तुम्ही देखील भरपूर पोषणमूल्यांचा खजिना असणारी शेवग्याच्या पानांची आवर्जून बनवून खा. ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा गरम भातासोबत गरमागरम अगदी चवदार लागते.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
June 04, 2025 6:35 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Shevgyachya Panachi Bhaji: आरोग्यासाठी फायदेशीर, घरीच बनवा शेवग्याच्या पानांची भाजी, एकदम सोपी रेसिपी, Video