उन्हाळ्यात जेवण जात नाही? तयार करा स्पेशल होडीची आमटी, वाढेल जेवणाची चव, रेसिपी पाहा

Last Updated:

होडीची आमटी ही खास रेसिपी उन्हाळ्यात बनवली जाते. याचीच रेसिपी मुंबईतील गृहिणी स्मिता कापडणे यांनी सांगितली आहे. 

+
News18

News18

प्रियंका जगताप, प्रतिनिधी 
मुंबई : महाराष्ट्रीयन जेवणात आमटी हा असा पदार्थ आहे जो सगळ्या जेवणाचे मुख्य स्थान भुषवतो. कोकणपट्टा असू द्या किंवा घाट माथा अनेक ठिकाणी आमटी बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे. शिवाय आमटीचे प्रकारही वेगवेगळे आहेत. आमटी मस्त झाली की, तिचा स्वाद पोळी, भाकरी, पुरळपोळी आणि भात या सगळ्यासोबत एकदम फक्कड लागते. अश्याच पद्धतीची होडीची आमटी ही खास रेसिपी उन्हाळ्यात बनवली जाते. याचीच रेसिपी मुंबईतील गृहिणी स्मिता कापडणे यांनी सांगितली आहे.
advertisement
होडीची आमटी म्हणजे काय? 
ही आमटी उन्हाळ्यात केली जाते. कारण उन्हाळ्यात भाज्यांना काही चव लागत नाही. त्यामुळे जेवणाची चव वाढवण्यासाठी ही आमटी बनवली जाते. ही आमटी समयी मासवडी सारखी असते. ज्यामध्ये बेसन पीठच्या आवरणात सारण भरून आमटीमध्ये सोडतात आणि यातील होडीचे बनलेले सारण आमटी वर तरंगते म्हणुन त्याला होडी आमटी म्हणतात.
advertisement
होडीची आमटी बनवण्यासाठी साहित्य 
कांदा, लसुन, सुके खोबर, आले, तिळ, खसखस, जिरे, शेंगदाणे, कोथिंबीर, धने पावडर, मीठ, बेसन पिठ, तेल, हळद, तिखट, हिंग, जिरे, मोहरी चवीनुसार साखर हे साहित्य लागेल.
होडीची आमटी बनवण्यासाठी कृती
सर्वप्रथम कांदा, लसुन, सुके खोबरे, आले, कोथिंबीर, हे सर्व आपण कापुन चांगले खरपूस भाजुन घेणे. त्याचे वापण तयार करुन घेणे. आता होडी बनविण्यासाठी लागणारे पिठ मळून घ्या. परातीमध्ये बेसन, पिठ, मीठ, तेल, हळद, तिखट आणि पाणी घेऊन त्याचा एक छान सा गोळा तयार करुन घ्या. आता खसखस, तिळ, खोबऱ्याचा किस, शेगंदाण्याचा कुट, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, हळद, चवीनुसार साखर हे सर्व भाजुन घ्या. यानंतर मिक्सरला जाडसर असे दळून घ्या.
advertisement
हॉटेलमधला चमचमीत पनीर टिक्का करी मसाला घरीच बनवा; ही पाहा रेसिपी, VIDEO
आता आमटीला फोडणी द्या. कढईत तेल घेऊन त्यामध्ये हिंग, जिरे, मोहरी घाला. मग त्यामध्ये तयार केलेले वाटण घालून छान परतुन घ्यावे. मग त्या मध्ये मसाले अ‍ॅड करुन आमटी तयार करणे. आमटीला उकळी आल्यावर आपण तयार केलेल्या होड्या आमटीत सोडाव्यात. आणि त्या मंद आचेवर शिजवाव्यात. अशा प्रकारे आपली ही मस्त झणझणीत होडीची आमटी तयार झाली आहे,असं स्मिता कापडणे सांगतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
उन्हाळ्यात जेवण जात नाही? तयार करा स्पेशल होडीची आमटी, वाढेल जेवणाची चव, रेसिपी पाहा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement