नाश्त्याला घरीच बनवा विदर्भ स्टाईल उकडपेंडी; अगदी सोप्प्या पद्धतीचा पाहा Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
उकडपेंडी ही विदर्भातील एक प्रसिद्ध रेसिपी आहे. घरोघरी अनेकदा नाश्ता करिता उकडपेंडी बनवली जाते.
अमिता शिंदे, प्रतिनिधी
अमरावती : उकडपेंडी ही विदर्भातील एक प्रसिद्ध रेसिपी आहे. घरोघरी अनेकदा नाश्त्या करिता उकडपेंडी बनवली जाते. वेगवेगळे कडधान्याचे पीठ एकत्र करून किंवा फक्त कणिक आणि रव्याला भाजून देखील ही चविष्ट अशी रेसिपी बनते. ही उकडपेंडीची विदर्भ स्टाईल रेसिपी कशी बनवायची याचीच माहिती अमरावती येथील गृहणी जयश्री पवार यांनी दिली आहे.
advertisement
उकडपेंडीसाठी लागणारे साहित्य
लालसर एकत्र भाजून घेतलेली रवा आणि कणिक, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, चिरलेली मिरची, कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ, धणेपूड, तेल हे साहित्य लागेल.
उपवासाला नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? महाशिवरात्रीला बनवा 'ही' वेगळी रेसिपी Video
उकडपेंडीसाठी कृती
सर्वप्रथम रवा आणि गव्हाची कणिक भाजून घ्यायची आहे. (ही भाजणी तुम्ही नेहमीकरिता स्टोअर करून ठेवून वापरू शकता. आणि यात वेगवेगळ्या कडधान्यचे पीठही अॅड करू शकता) कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कांदा आणि मिरची अॅड करून घ्या. कांद्याला लालसर रंग येतपर्यंत शिजवून घ्या. त्यात टोमॅटो आणि कढीपत्ता अॅड करून चांगलं शिजू द्या. टोमॅटोसह त्यात दही देखील अॅड करता येईल. त्यानंतर आपण घेतलेले सर्व मसाले, तिखट, हळद, मीठ, धणेपूड, एकत्र करून परतून घ्या. त्यात आता भाजलेला रवा आणि कणिक अॅड करा. चांगलं परतून घ्या, 2 मिनिट एकत्र करून घ्या. आता त्यात पाणी घालून 2-3 मिनिटे शिजू द्या. आता विदर्भ प्रसिद्ध उकडपेंडी खाण्यासाठी तयार आहे.
advertisement
घरच्या घरी कोबी पासून बनवा स्क्रीप्सी व्हेज ड्राय मंच्युरियन, सोप्या रेसिपीचा पाहा Video
तर अशाप्रकारे अगदी 10 मिनिटांत बनवून तयार होणारी विदर्भात आवडीने खाल्ली जाणारी उकडपेंडी कोणी सहज बनवू शकेल. रवा, कणिक, टोमॅटो, मिरची, कांदा आणि घरगुती रोजचे मसाले हे घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्य पासून ही रेसिपी बनवून तयार होते. आजारी व्यक्तीलाही खाल्ल्यानंतर चव चांगली येईल. ही उकडपेंडी थोडी आंबट गोड, तिखट आणि गरम अशीच चव चांगली लागते. त्यामुळे तुम्हीही ही विदर्भ स्टाईल रेसिपी नक्की ट्राय करून बघा.
Location :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
March 05, 2024 3:22 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
नाश्त्याला घरीच बनवा विदर्भ स्टाईल उकडपेंडी; अगदी सोप्प्या पद्धतीचा पाहा Video