Kharbuja Shake Recipe : उन्हाळ्यात राहा कूल, फक्त 5 मिनिटांमध्ये तयार खरबूज मिल्कशेक, सोपी रेसिपी Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
सध्याला बाजारात मोठ्या प्रमाणात खरबूज विक्रीसाठी आलेले आहेत. खरबूजापासून झटपट असा मिल्कशेक घरच्या घरी तुम्ही करू शकता.
छत्रपती संभाजीनगर : सध्या कडाक्याचे ऊन पडत आहे. अशा उन्हामध्ये आपल्याला काहीतरी थंडगार खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होत असते. पण सतत बाहेरचं खाणं हे आरोग्यासाठी चांगलं नसतं. सध्याला बाजारात मोठ्या प्रमाणात खरबूज विक्रीसाठी आलेले आहेत. तर या खरबूजापासून झटपट असा मिल्कशेक घरच्या घरी कसा करायचा? याची रेसिपी आपल्याला ऋतुजा पाटील यांनी सांगितलेली आहे. अगदी कमीत कमी साहित्य यासाठी लागतं आणि मोजून 5 मिनिटांमध्ये हा शेक तयार होतो.
खरबूज शेकसाठी लागणारे साहित्य
एक मध्यम आकाराचे खरबूज, साखर, एक ग्लास दूध, सब्जा सीड्स ( पंधरा मिनिटं या सब्जा सीड्स पाण्यामध्ये भिजत घालत ठेवायच्या.) बर्फाचे तुकडे एवढेच साहित्य यासाठी लागेल.
खरबूज शेक करण्याची कृती
सर्वप्रथम खरबूजाचा थोडासा भाग कापून घ्यायचा. त्यानंतर त्यामधल्या ज्या सर्व बिया आहेत त्या काढून घ्यायच्या. बिया काढल्यानंतर खरबुजाचा जो गर आहे तो सर्व व्यवस्थित काढून घ्यायचा. खरबुजाचा वरचा जो भाग आहे तो तसाच ठेवून द्यायचा. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेला खरबुजाचा गर घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर टाकून घ्यायची आहे. त्यामध्ये एक ग्लास दूध टाकायचं. थोडेसे बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे. सब्जा सीड्स टाकून घ्यायचा.
advertisement
हे सर्व मिश्रण मिक्सरमधून एकत्रच एकजीव आणि एकदम बारीक करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने हा शेक तयार होतो. याला सर्व्ह करण्यासाठी खरबुजाचे वरचे आवरण आहे त्यामध्ये सुरुवातीला पहिले बर्फाचे तुकडे टाकायचे. त्यानंतर थोड्या सब्जा सीड्स टाकायच्या आणि तयार केलेला शेक टाकायचा. वरतून थोडेसे बारीक असे खरबुजाचे काप करून टाकायचे. तर अशा पद्धतीने हा खरबूज शेक तयार होतो. तर तुम्ही सुद्धा घरी हा एकदा नक्की ट्राय करा.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
May 03, 2025 2:32 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Kharbuja Shake Recipe : उन्हाळ्यात राहा कूल, फक्त 5 मिनिटांमध्ये तयार खरबूज मिल्कशेक, सोपी रेसिपी Video