उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? असे बनवा घावन Video

Last Updated:

तांदळाच्या पिठाच्या डोस्या प्रमाणेच हे उपवासाचे घावन असते. तेही कुरकुरीत आणि झटपट तयार होते.

+
News18

News18

मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
मुंबई : उपवास म्हटलं की साबुदाना खिचडी, रताळ्याचा किस, साबुदाना वडा, बटाटा किंवा केळीचे वेफर्स असेच पदार्थ आपण शक्यतो खातो. पण नेहमी हेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल किंवा नवीन काहीतरी रेसिपी करून पाहायची असेल तर उपवासाचे घावन करू शकता. तांदळाच्या पिठाच्या डोस्या प्रमाणेच हे उपवासाचे घावन असते. तेही कुरकुरीत आणि झटपट तयार होते. हे उपवासाचे घावन साबुदाणा आणि वरईचे तांदूळ किंवा भगर यांच्या एकत्रित मिश्रानातून तयार केले जाते. हे उपवासाचे घावन स्वादिष्ट तर असतेच पण अत्यंत पौष्टिकही असते. हे घावन महाशिवरात्रीसाठी घरी कसे बनवायचे याचीच रेसिपी मुंबईतील गृहिणी संगिता गायकवाड यांनी सांगितली आहे.
advertisement
उपवासाचे घावन बनवण्यासाठी लागणारं साहित्य
एक कप वरई, एक कप साबुदाणा, एक कप शेंगदाण्याचा कूट, एक मोठा बटाटा, एक छोटी वाटी दही, मीठ, तूप किंवा तेल हे साहित्य लागेल.
उपवासाचे घावन बनवण्यासाठी सर्वप्रथम साबुदाणा आणि वरई एकत्र 4 ते 5 तास भिजवून ठेवावे. पाण्याची पातळी साबुदाणा आणि वरईच्या वरती 2 इंचापर्यंत असावी.
advertisement
साबुदाणा आणि वरई दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. वाटतानात तुम्हाला हवं तर त्यात मिरची, शेंगदाण्याचा कूटही मिक्स केला तरी चालेल. या मिश्रणात थोडसं दही घालून हे मिक्सरमधून बारीक करुन हे मिश्रण थोडा वेळ बाजूला काढून ठेवावं. तवा 2 मिनीट चांगला गरम होऊ द्यावा. तव्यावर बाजूने तेल किंवा तूप सोडावं. एक पळी मिश्रण तव्यावर पातळ पसरुन घ्यावं. कडेने एक चमचा तेल सोडावं. एक बाजू भाजली की दुसरी बाजू नीट भाजून घ्यावी. अगदी झटपट आणि अगदी दोन ते तीन मिनीटात हे घावन तयार होत. हे गरमागरम घावन तुम्ही नारळाच्या चटणीसोबत, उपवासाच्या बटाट्यासोबत किंवा अगदी दह्यासोबतही खाऊ शकतात आणि ते तेवढेच रुचकर लागतात.
advertisement
उपवासाला नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? महाशिवरात्रीला बनवा 'ही' वेगळी रेसिपी Video
तर, हे झटपट होणारे कुरकुरीत असे हे साबुदाणा आणि घावन फक्त उपवासालाच नाही तर अगदी सकाळी हलक्या-फुलक्या नाश्त्यासाठीही करू शकता.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? असे बनवा घावन Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement