घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा उपमा प्रीमिक्स, एकदा बनवला की एक महिना राहतो टिकून, रेसिपीचा संपूर्ण Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
जर तुम्ही कुठे प्रवास करत असाल किंवा तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असाल तर तुम्ही झटपट असं उपमाचे प्रीमिक्स कसा तयार करू शकता. अगदी झटपट बनवून असं हे उपमा प्रीमिक्स तयार होतं.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : आपल्या पैकी अनेकांचा घरी सकाळच्या नाश्त्यासाठी उपमा किंवा पोहे केले जातात. कारण की हे झटपट असे बनून तयार होतात. जर तुम्ही कुठे प्रवास करत असाल किंवा तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असाल तर तुम्ही झटपट असं उपमाचे प्रीमिक्स तयार करू शकता. अगदी झटपट बनवून असं हे उपमा प्रीमिक्स तयार होतं. त्यामध्ये तुम्हाला फक्त गरम पाणी टाकल्यानंतर तुमचा उपमा बनून तयार होतो आणि हे प्रीमिक्स तुम्ही साधारणपणे एक ते दीड महिना बिना फ्रिज साठवून ठेवू शकता. उपमा प्रीमिक्स कसा बनवायचा याचीच रेसिपी आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर प्रज्ञा तल्हार यांनी सांगितली आहे.
advertisement
उपमा प्रीमिक्स तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
एक वाटी रवा, तेल, जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, उडीद डाळ, हिंग, मीठ, साखर, शेंगदाणे एवढे साहित्य लागेल.
उपमा प्रीमिक्स बनवण्याची कृती
सर्वप्रथम एका कढईमध्ये रवा टाकून तो व्यवस्थित रित्या भाजून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा. त्यानंतर रवा बाजूला काढून घ्यायचा. त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल टाकायचं. त्यामध्ये जिरे, मोहरी, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. त्यानंतर त्यामध्ये उडीद डाळ टाकायची, हिंग टाकायचा, मीठ टाकायचं आणि त्याला एकजीव करून घ्यायचं. हे सर्व पदार्थ व्यवस्थित रित्या भाजून घ्यायचं.
advertisement
त्यानंतर त्यामध्ये आपण भाजलेला रवा टाकून द्यायचा आणि तो रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा. हे सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडीशी चवीपुरती साखर टाकायची. परत एकदा सर्व एकत्र करून भाजून घ्यायचं अशा पद्धतीने हे प्रीमिक्स तयार होतं. हे प्रीमिक्स तुम्ही चांगले एक ते दीड महिना स्टोअर करून ठेवू शकता.
advertisement
जेव्हा पण तुम्हाला उपमा खायचा असेल तेव्हा तुम्ही गरम पाणी करायचं. त्यामध्ये तीन-चार चमचे हे प्रीमिक्स टाकायचं आणि तुमचा उपमा बनवून तयार होतो. तर घरी एकदा हे उपमा प्रीमिक्स नक्की ट्राय करा तुम्हाला देखील खूप आवडेल.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
December 24, 2024 5:03 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा उपमा प्रीमिक्स, एकदा बनवला की एक महिना राहतो टिकून, रेसिपीचा संपूर्ण Video