Fasting Food: पित्ताच्या त्रासामुळे उपवासाला खिचडी नको? मग महाशिवरात्रीला घरीच बनवा हेल्दी रेसिपी
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Fasting Recipe: महाशिवरात्रीला अनेकजण उपवास करत असतात. पण काहींना उपवासाला खिचडी आणि इतर पदार्थ खाल्ल्याने त्रास होतो. तर आरोग्यदायी रेसिपी घरीच बनवू शकता.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती: महाशिवरात्रीला उपवास धरायचा आहे, पण साबुदाणा आणि इतर पदार्थ खाल्ल्याने पित्ताचा त्रास होतोय? तर तुम्ही फळं खाऊ शकता. पण फळं सुद्धा तशी खायला आवडतं नसतील, तर तुमच्याकडे टेस्टी आणि हेल्दी असणारं ऑप्शन म्हणजे फ्रूटसॅलड. तुम्हाला हवी असणारी सर्व फळं एकत्रित करून तुम्ही 5 मिनिटात फ्रूट सॅलड बनवू शकता. टेस्टी आणि हेल्दी असं फ्रूटसॅलड कसं बनवायचं? याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी जया भोंडे यांनी सांगितली आहे.
advertisement
फ्रूटसॅलड बनवण्यासाठी लागणारे साहित्य
द्राक्षे, केळी, ॲपल, अनार, चिकू ही सर्व फळ आपण बारीक काप करून घ्यायचे आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात आणखी काही फळ जसे, स्ट्रॉबेरी, किवी, संत्रा घेऊ शकता. तसेच त्यानंतर चाट मसाला, मीठ, लिंबाचा रस आणि मध सुद्धा वापरू शकता.
advertisement
फ्रूटसॅलड बनवण्याची कृती
फ्रूटसॅलड बनवण्यासाठी सर्वात आधी फळांचे बारीक काप करून घ्यायचे आहे. त्यानंतर सर्व फळं एकत्र मिक्स करून घ्यायची आहेत. मिक्स केल्यानंतर त्यात मध टाकून घ्यायचा. तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात मध तुम्ही टाकू शकता. त्यानंतर चाट मसाला टाकून घ्यायचा आणि तो सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे.
त्यानंतर लिंबाचा रस आणि मीठ टाकून घ्यायचं ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं. तुम्ही यात काळे मीठ सुद्धा वापरू शकता. हवं असल्यास पुदिना सुद्धा टाकून घेऊ शकता. कमीत कमी वेळात टेस्टी आणि हेल्दी असं फ्रूटसॅलड तयार होईल. त्याचबरोबर तुम्हाला लागत असल्यास तुम्ही यात सर्व फळं घेऊ शकता. किवी, स्ट्रॉबेरी, संत्रा आणि इतरही काही फळं तुम्हाला आवडत असतील, तर तुम्ही छान असं उपवासासाठी फ्रूट सॅलड तयार करू शकता.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
Feb 25, 2025 3:33 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Fasting Food: पित्ताच्या त्रासामुळे उपवासाला खिचडी नको? मग महाशिवरात्रीला घरीच बनवा हेल्दी रेसिपी








