मार्केटमध्ये मिळणारे नूडल्स याच्यापुढे काहीच नाही, चायनिज सुद्धा विसराल VIDEO

Last Updated:

मार्केटमधील नूडल्स नको वाटतात तर ज्वारीच्या पिठाचे नूडल्स घरीच ट्राय करू शकता. पाहा सोपी रेसिपी..

+
मार्केटमध्ये

मार्केटमध्ये मिळणारे नूडल्स याच्यापुढे काहीच नाही, चायनिज सुद्धा विसराल VIDEO

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांना नूडल्स खायला आवडतं. पण बऱ्याचदा मार्केटमधील नूडल्स खाणं आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतं. त्यासाठी ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक नुडल्स उत्तम पर्याय आहे. हे नूडल्स घरच्या घरी कसे बनवायचे? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. प्रज्ञा तल्हार यांनी माहिती दिलीय.
नूडल्स तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
एक वाटी ज्वारीचे पीठ, एक वाटी पाणी, तेल, गाजर, शिमला मिरची, पत्ता गोबी, फ्रेंच बींन, कांदा, बारीक चिरलेला लसूण, अद्रक, बारीक चिरलेली मिरची, ब्लॅक पेपर पावडर, सोया सॉस, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस आणि सोऱ्या हे साहित्य लागतं.
advertisement
ज्वारीच्या पिठाचे नूडल्स बनवायची कृती
सर्वप्रथम नूडल्स करण्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी पाणी घालून त्यामध्ये थोडसं तेल घालायचं. त्याला उकळी आली की त्यामध्ये एक वाटी ज्वारीचे पीठ घालायचे. हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं. त्यानंतर झाकण ठेवून पाच मिनिटे वाफवून घ्यायचं. त्यानंतर हाताला तेल लावून हे मिश्रण थोडंसं मळून घ्यायचं. तुम्ही सोऱ्यामध्ये घालून त्याचे नूडल्स तयार करायचे. पाच मिनिटं वाफवून घ्यायचं. त्यानंतर त्याला थोडं तेल लावून द्यायचं.
advertisement
कढईमध्ये थोडसं तेल घ्यायचं. त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, अद्रक, हिरवी मिरची हे टाकून ते छान फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेल्या भाज्या आहेत त्या सर्व टाकायच्या. भाजी जास्त शिजवायची नाही. यानंतर रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप टाकायचं आणि सोया सॉस टाकायचं. आपल्या आवडीनुसार ब्लॅक पेपर पावडर टाकायची. हे मिश्रण दोन मिनिटं शिजवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये नूडल्स तयार झालेले आहेत ते टाकून घ्यायचे. ते एक दोन मिनिटात शालो झाल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा.
advertisement
नूडल्स एका प्लेटमध्ये टाकून त्यावर तुम्ही गार्निशिंगसाठी कांद्याची पात बारीक चिरून टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ज्वारीच्या पिठापासून घरच्या घरी नूडल्स तयार करू शकता.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
मार्केटमध्ये मिळणारे नूडल्स याच्यापुढे काहीच नाही, चायनिज सुद्धा विसराल VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement