Winter Bath: रोज अंघोळ करण्याच्या बाबतीत भारत अव्वल; पण याचे शरीरावर गंभीर परिणाम, विज्ञान काय सांगतं?
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
जर कोणी म्हटलं, की रोज आंघोळ करू नका, त्यामुळेही नुकसान होऊ शकतं, तर तुम्ही काय म्हणाल? निदान विज्ञान तरी तेच सांगतं
नवी दिल्ली 06 डिसेंबर : भारत एक असा देश आहे जिथे लोक साधारणपणे दररोज आंघोळ करण्यावर विश्वास ठेवतात. कडाक्याच्या थंडीतही लोक अंघोळ करणं सोडत नाहीत. ही आपली सवय आहे, तर भारतीय संस्कृतीत आंघोळीला शुद्धतेशीही जोडलं गेलं आहे आणि त्याला वेगळा आणि महत्त्वाचा दृष्टीकोन दिला गेला आहे. आपल्या संस्कृतीत आंघोळ ही पवित्र क्रिया आहे. पण अशा परिस्थितीत जर कोणी म्हटलं, की रोज आंघोळ करू नका, त्यामुळेही नुकसान होऊ शकतं, तर तुम्ही काय म्हणाल? निदान विज्ञान तरी तेच सांगतं.
जगातील सर्वाधिक आंघोळ करणाऱ्यांमध्ये भारतातील लोकांची गणना होते. धार्मिक श्रद्धेमुळे जवळजवळ सगळेच भारतीय दररोज स्नान करतात. कारण त्यांना असं वाटतं, की असं केल्यानं त्यांचं शरीर आणि मन केवळ ताजेतवानं होत नाही तर ते शरीर शुद्ध करतं. पुष्कळ भारतीय दररोज आंघोळ करतात कारण, त्यांचा असा विश्वास आहे की पूजेसाठी दररोज स्नान करणं आवश्यक आहे. पण विज्ञान काही वेगळंच सांगतं.
advertisement
विज्ञानाचा असा विश्वास आहे, की जर तुम्ही दररोज आंघोळ करत असाल तर तुम्ही स्वतःचं नुकसान करत आहात आणि तुमची प्रतिकारशक्ती देखील कमी करत आहात. जगभरातील त्वचा तज्ज्ञांचा असा विश्वास आहे, की जर तुम्ही हिवाळ्यात दररोज आंघोळ करत नसाल तर चांगलं आहे. जास्त आंघोळ केल्याने आपल्या त्वचेला हानी पोहोचते. उन्हाळ्यात दररोज आंघोळ करणं सर्वांनाच आवडत असलं तरी हिवाळ्यात आंघोळ करणं नुकसानकारक ठरू शकतं.
advertisement
अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झालं आहे, की त्वचेमध्ये स्वतःला स्वच्छ करण्याची क्षमता चांगली असते. जर तुम्ही जिममध्ये जात नसाल किंवा दररोज घाम येत नसेल तसंच धुळीत जात नसाल तर तुम्हाला दररोज आंघोळ करणं आवश्यक नाही.
हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ केली तर फायदा होण्यापेक्षा जास्त नुकसान होतं. यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. यामुळे शरीरातील नैसर्गिक तेल निघून जातं. शरीरातील हे नैसर्गिक तेल आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचं आहे. हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी देखील काम करतं. विज्ञानानुसार, हे ऑईल तुम्हाला मॉइश्चराइज आणि सुरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
advertisement
जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी (वॉशिंग्टन डीसी, यूएस) येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सी. ब्रॅंडन मिशेल म्हणतात, की आंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जातं, ज्यामुळे चांगले बॅक्टेरिया देखील निघून जातात. हे बॅक्टेरिया रोगप्रतिकारक शक्तीला देखील सपोर्ट देत असतात. त्यामुळे हिवाळ्यात आठवड्यातून दोन किंवा तीन दिवसच आंघोळ करावी.
अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ Utah च्या जेनेटिक्स सायन्स सेंटरच्या अभ्यासानुसार, “जास्त अंघोळ केल्याने आपल्या मानवी शरीराच्या संरक्षण यंत्रणेला हानी पोहोचते. जंतू आणि विषाणूंशी लढण्याची क्षमता कमकुवत होते. अन्न पचवण्याची क्षमता आणि त्यातून जीवनसत्त्वे आणि इतर पोषक घटक वेगळे करण्याची क्षमता देखील प्रभावित होते.
advertisement
दररोज गरम पाण्याने आंघोळ केल्यानं तुमच्या नखांनाही नुकसान होतं. आंघोळ करताना तुमची नखं पाणी शोषून घेतात. मग ते मऊ होतात आणि तुटतात. हे नैसर्गिक तेलदेखील काढून टाकतं, ज्यामुळे ते कोरडे आणि कमकुवत होतात. दररोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने नखांना इजा होऊ शकते. आंघोळ करताना नखं पाणी शोषून घेतात, यामुळे त्यांची नैसर्गिक चमक आणि गुळगुळीतपणा कमी होतो. यामुळे नखं कोरडी आणि कमकुवत होण्याचा धोका वाढतो.
advertisement
भारत, जपान आणि इंडोनेशियाचे लोक आंघोळीच्या बाबतीत जगातील अव्वल देशांमध्ये खूप पुढे असल्याचं नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांतील अनेक संशोधनांनी हे सिद्ध केलं आहे की दररोज आंघोळ करणं केवळ पाण्याचा अपव्ययच नाही तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही हानिकारक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 06, 2023 11:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Bath: रोज अंघोळ करण्याच्या बाबतीत भारत अव्वल; पण याचे शरीरावर गंभीर परिणाम, विज्ञान काय सांगतं?








