advertisement

Tips And Tricks : घरी आणलेल्या नव्या सामानावरचे स्टिकर काढायचेत? 'या' 5 ट्रिक्स वापरा, सहज आणि स्वच्छ निघतील

Last Updated:

How to remove stickers easily from products : काचेच्या डब्यावरचे स्टिकर काढणे बऱ्याचदा अवघड काम होऊ शकते. कारण ते खूप घट्ट चिकटलेले असतात आणि काढायला गेलं तर ते स्वच्छ आणि पूर्णपणे निघत नाही. कागदाचा काही त्याला चिकटूनच राहतो. तेव्हा ते फारच वाईट दिसतं.

नवीन वस्तूंमधून स्टिकर्स काढण्यासाठी स्मार्ट ट्रिक्स
नवीन वस्तूंमधून स्टिकर्स काढण्यासाठी स्मार्ट ट्रिक्स
मुंबई : बऱ्याचदा आपण घरी कोणतेही प्रोडक्ट आणतो. आणि त्याची काचेची बॉटल आपल्याला आवडली तर आपण ती ठेऊन घेतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण कॉफीचा डबा आणला असेल, तर त्यातली कॉफी संपल्यानंतरही आपल्याला तो डबा फेकावासा वाटत नाही. मात्र त्यावरचं स्टिकरही लवकर निघत. याचसाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत.
काचेच्या डब्यावरचे स्टिकर काढणे बऱ्याचदा अवघड काम होऊ शकते. कारण ते खूप घट्ट चिकटलेले असतात आणि काढायला गेलं तर ते स्वच्छ आणि पूर्णपणे निघत नाही. कागदाचा काही त्याला चिकटूनच राहतो. तेव्हा ते फारच वाईट दिसतं. मात्र आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देत आहोत. ज्याद्वारे तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने ते काढू शकाल.
advertisement
नेल पॉलिश रिमूव्हर : जाड किंवा कांदा स्टिकर काढण्यासाठी हा अगदी उत्तम उपाय आहे. कापसाचा गोळा रिमूव्हरमध्ये बुडवा आणि स्टिकरवर लावा. 5-7 मिनिटांनंतर स्टिकर हळूवारपणे काढा. याने स्टिकर तर निघेलच शिवाय डब्यावर काहीही चिकट भाग राहणार नाही.
बेकिंग सोडा आणि तेल : आणखी एक घरगुती उपाय म्हणजे बेकिंग सोडा आणि तेल. या दोन्हींची पेस्ट चिकटपणा दूर करते. बेकिंग सोडा आणि कोणतेही खायचे तेल समान प्रमाणात मिसळून पेस्ट बनवा आणि ती स्टिकरवर लावा. 15 मिनिटानंतर तुम्ही कापडाने पुसून हे स्टिकर सहज काढू शकता.
advertisement
हेअर ड्रायरचा वापर : स्टिकर काढण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे उष्णता. मात्र आपण डबा थेट आगीवर धरू शकत नाही. त्यामुळे हेअर ड्रायरच्या गरम हवेचा पण वापर करू शकतो. हेअर ड्रायर स्टिकरपासून 2-3 इंच अंतरावर धरा आणि 30-40 सेकंद स्टिकर गरम होऊ द्या. याने स्टिकर काढताना ते अगदी स्वच्छ आणि पूर्णपणे निघून येईल.
advertisement
व्हिनेगर : घरगुती उपायांमध्ये चिकटपणा कमी करण्यासाठी व्हिनेगरही उत्तम मानले जाते. व्हिनेगरमध्ये कापसाचा गोळा बुडवून स्टिकरवर ठेवा. याने 10-15 मिनिटांनंतर स्टिकर सहज निघून जाईल. नंतर तुम्ही डबा स्वच्छ करू शकता.
कोमट पाणी आणि भांडी धुणे : काचेच्या डब्यांसाठी किंवा कोणत्याही वॉटरप्रूफ गोष्टींवरील स्टिकर काढण्यासाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता. यासाठी थोडे डिशवॉशिंग लिक्विड कोमट पाण्यात मिसळा. स्पंजच्या साहाय्याने हे स्टिकरवर हळूवारपणे घासून काढण्याचा प्रयत्न करा. यानेही स्टिकर सहज निघेल.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tips And Tricks : घरी आणलेल्या नव्या सामानावरचे स्टिकर काढायचेत? 'या' 5 ट्रिक्स वापरा, सहज आणि स्वच्छ निघतील
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement