Women Health : पीरियड्समध्ये होणाऱ्या तीव्र वेदना झटपट होतील कमी, सोहा अली खानने सांगितला पेन कमी करणाऱ्या चहाचा फॉर्मुला
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
मासिक पाळीतील वेदना आणि पीएमएस क्रॅम्प्स हा अनेक महिलांसाठी त्रासदायक अनुभव असतो. या वेदना कमी करण्यासाठी अनेकजणी औषधे घेतात, पण अभिनेत्री सोहा अली खान यांसारख्या अनेक सेलिब्रिटी नैसर्गिक आणि घरगुती उपचारांवर विश्वास ठेवतात.
Tea For PMS Cramps : मासिक पाळीतील वेदना आणि पीएमएस क्रॅम्प्स हा अनेक महिलांसाठी त्रासदायक अनुभव असतो. या वेदना कमी करण्यासाठी अनेकजणी औषधे घेतात, पण अभिनेत्री सोहा अली खान यांसारख्या अनेक सेलिब्रिटी नैसर्गिक आणि घरगुती उपचारांवर विश्वास ठेवतात. सोहाने अलीकडेच मासिक पाळीचा त्रास कमी करणारा एक खास चहाचा फॉर्म्युला उघड केला आहे. हा चहा केवळ वेदना कमी करत नाही, तर शरीराला आतून ऊर्जा देतो.
आले आहे मुख्य घटक
या चहाचा मुख्य घटक आहे आले. आल्यामध्ये दाह-विरोधी गुणधर्म असतात. ते शरीरातील सूज कमी करून क्रॅम्प्समुळे होणाऱ्या वेदनांपासून त्वरित आराम देते.
हळदीचा प्रभावी वापर
हळद हे दुसरे महत्त्वाचे औषध आहे. हळदीतील करक्यूमिन मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी प्रभावी ठरते आणि स्नायूंना आराम देते.
advertisement
दालचिनी नियंत्रण
दालचिनी रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंना शिथिल करते. यामुळे ओटीपोटात होणारे अचानक येणारे क्रॅम्प्स नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
काळे मिरे शोषणास मदत
चहामध्ये चिमूटभर काळे मिरे घातल्यास हळदीतील करक्यूमिनचे शोषण शरीरात अधिक प्रभावीपणे होते. त्यामुळे हळदीचा वेदनाशामक प्रभाव वाढतो.
मध
आले आणि दालचिनीसोबत मिसळल्याने त्यांचा प्रभाव वाढतो आणि गोड चव मूडला आराम देते.
advertisement
चहा बनवण्याची सोपी पद्धत
एक कप पाण्यात आले, हळद, दालचिनीचा छोटा तुकडा आणि काळे मिरे टाकून उकळा. पाणी अर्धे झाल्यावर गाळून घ्या आणि त्यात चवीनुसार गूळ किंवा मध मिसळून प्या. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 9:04 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Women Health : पीरियड्समध्ये होणाऱ्या तीव्र वेदना झटपट होतील कमी, सोहा अली खानने सांगितला पेन कमी करणाऱ्या चहाचा फॉर्मुला