Tea vs Coffee : सकाळची सुरुवात चहाने की कॉफीने? काय आहे सगळ्यात बेस्ट?

Last Updated:

ही पेये फक्त चव वाढवतात असे नाही, तर मेंदूला ताजेतवाने करतात आणि शरीराला उर्जाही देतात. पण नेहमीच एक प्रश्न पडतो नेमकं कोणतं पेय अधिक चांगलं?

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : भारतीय लोकांसाठी चहा आणि कॉपी हे आवडीचं पेय आहे. काही लोक चहा पितात तर काही लोक कॉफी पितात. अनेकांच्या दिवसाची सुरुवात या पेयांनी होते. तर अनेकांच्या घरी तुम्ही पाहूणे म्हणून गेलात तरी देखील चहा कॉफी पिण्यासाठी दिला जातो.
ही पेये फक्त चव वाढवतात असे नाही, तर मेंदूला ताजेतवाने करतात आणि शरीराला उर्जाही देतात. पण नेहमीच एक प्रश्न पडतो नेमकं कोणतं पेय अधिक चांगलं? चहा आणि कॉफी या दोन्हींचे वेगवेगळे फायदे आणि तोटे आहेत. योग्य प्रमाणात घेतल्यास ही पेये आरोग्यासाठी उपयोगी ठरतात, पण अतिरेक केल्यास त्रासही होऊ शकतो.
कॉफीचे फायदे आणि तोटे
कॉफीत कॅफिनचं प्रमाण अधिक (80-100 मिग्रॅ) असतं. त्यामुळे ती लगेच ऊर्जा देते आणि जागरूकता वाढवते. मात्र, जास्त कॉफी घेतल्यास बेचैनी, चिंता, झोप न लागणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. ऊर्जा झपाट्याने वाढल्यामुळे ती अचानक कमीही होऊ शकते.
advertisement
कॉफीत पॉलीफेनॉल्स आणि क्लोरोजेनिक ऍसिड असतात. हे मेंदूच्या कार्यक्षमतेचे रक्षण करतात, अल्झायमर, पार्किन्सन आणि टाईप 2 डायबिटीजसारख्या आजारांचा धोका कमी करतात. याशिवाय, कॉफी लिव्हरच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते.
चहाचे फायदे आणि तोटे
चहात कॅफिन कमी प्रमाणात (30-50 मिग्रॅ) असते. त्यामुळे चहा घेतल्यावर झोप हळूहळू पण जास्त वेळ खुली राहते. यात असणारे एल-थीनाइन मनाला शांतता आणि एकाग्रता प्रदान करते.
advertisement
ग्रीन टी आणि ब्लॅक टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक असतात, जे हृदयविकाराचा धोका कमी करतात, पचन सुधारतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. पण, जास्त चहा घेतल्यास शरीरातील लोह शोषणात अडथळा येऊ शकतो आणि झोपेचा त्रास होऊ शकतो.
दोन्हींचा संतुलित वापर का महत्त्वाचा?
चहा आणि कॉफी दोन्ही डाययूरेटिक असल्याने जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरातील पाण्याची कमतरता भासू शकते. त्यामुळे या पेयांचा मर्यादित वापर करणेच योग्य.
advertisement
पाश्चात्य देशांत कॉफी ही कॅफे संस्कृती आणि त्याच्या उत्पादकतेचे प्रतीक मानले जाते, तर आशियाई देशांत चहा हा शांतता आणि अतिथ्याचे प्रतीक आहे. बरेच लोक सकाळी ऊर्जा मिळवण्यासाठी कॉफी घेतात आणि संध्याकाळी मन शांत करण्यासाठी चहा पितात.
चहा आणि कॉफी दोन्हींचे वेगवेगळे फायदे आहेत. कॉफी तात्काळ ऊर्जा व चयापचय सुधारण्यासाठी उपयुक्त, तर चहा दीर्घकालीन आरोग्य आणि मन:शांतीसाठी चांगला. कोणते पेय आपल्यासाठी योग्य आहे हे आपल्या आरोग्य, जीवनशैली आणि सवयींवर अवलंबून आहे. संयमित प्रमाणात सेवन केल्यास ही दोन्ही पेये आपला दैनंदिन जीवन अधिक ऊर्जावान आणि आरोग्यदायी बनवू शकतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tea vs Coffee : सकाळची सुरुवात चहाने की कॉफीने? काय आहे सगळ्यात बेस्ट?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement