BCCIचा Bank Balance समोर आला, डोळे विस्फारतील; संपत्तीची आकडेवारी धडकी भरवणारी, आयकर भरण्याची तयारी

Last Updated:

BCCI Bank Balance: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा खजिना दिवसेंदिवस फुगत चालला आहे. 2019 पासून तब्बल 14,627 कोटी रुपयांची भर पडल्याने BCCI आता जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड म्हणून आणखी मजबूत झाला आहे.

News18
News18
मुंबई : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखला जातो. जगातील सर्वात लोकप्रिय टी२० लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (IPL) बीसीसीआय आयोजित करते. आयपीएलमुळे बोर्डाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. बीसीसीआयची वाढती संपत्ती आणि बँक बॅलन्स पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका अहवालानुसार 12 महिन्यांपूर्वी बोर्डाची बँक बॅलन्स 20,686 कोटी रुपये होती.
advertisement
बीसीसीआयच्या संपत्तीमध्ये गेल्या एका वर्षात मोठी वाढ झाली आहे. या बोर्डाचा आर्थिक अहवाल 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक बैठकीत (AGM) सादर केला जाईल. 2024 च्या एजीएममध्ये सादर झालेल्या खाते विवरणानुसार, सचिव महोदयांनी सदस्यांना माहिती दिली आहे की- 2019 पासून बीसीसीआयची रोख रक्कम आणि बँक बॅलन्स 6,059 कोटी रुपयांवरून 20,686 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. ही आकडेवारी राज्य क्रिकेट संघटनांना वितरित करण्यात येणाऱ्या रकमेच्या आधीची आहे. म्हणूनच 2019 पासून बीसीसीआयने गेल्या पाच वर्षांत 14,627 कोटी रुपयांची भर घातली आहे. ही वाढ मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 4,193 कोटी रुपये अधिक आहे. याव्यतिरिक्त 2019 पासून जनरल फंड देखील 3,906 कोटी रुपयांवरून 7,988 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. ही वाढ 4,082 कोटी रुपयांची वाढ आहे.
advertisement
या अहवालात असेही म्हटले आहे की- बीसीसीआय आयकर भरत नाही, ही केवळ एक अफवा आहे. बोर्डाने विविध न्यायाधिकरणांमध्ये आपले अपील सुरू ठेवले असतानाही करासाठी 3,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकची तरतूद केली आहे. अहवालात उघड करण्यात आले आहे, बीसीसीआयने आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयकर दायित्वासाठी 3,150 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जरी बीसीसीआय न्यायालये आणि न्यायाधिकरणांसमोर योग्य मार्गावर असले तरी, त्यांनी कराच्या कोणत्याही दायित्वाच्या पेमेंटसाठी तरतूद केली आहे.
advertisement
बोर्डाचे उत्पन्न आणखी जास्त झाले असते, पण बीसीसीआयच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून मिळणाऱ्या सकल मीडिया हक्क उत्पन्नामध्ये घट झाली. हे उत्पन्न गेल्या वर्षीच्या 2,524.80 कोटी रुपयांच्या तुलनेत 813.14 कोटी रुपये राहिले. अहवालानुसार ही घट गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात खेळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय देशांतर्गत सामन्यांची/मालिकेंची कमी संख्या असल्यामुळे झाली आहे. या वर्षात आयसीसी सीडब्ल्यूसी 2023 (एकदिवसीय विश्वचषक) चे आयोजन बीसीसीआयने ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये केले होते.
advertisement
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
BCCIचा Bank Balance समोर आला, डोळे विस्फारतील; संपत्तीची आकडेवारी धडकी भरवणारी, आयकर भरण्याची तयारी
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement