flight rates monsoon offer : पावसाळ्यात विमानाच्या तिकिटात भरघोस सूट, विमान कंपन्यांनी दिली ही ऑफर
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
प्रवाशांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय रुटवर विमानाभाड्याच्या दरात सूट देण्यात येत आहे. विस्ताराने 4 दिवसांचा सेल सुरू केला आहे. तर यासोबतच इंडिगो, एअर इंडिया सह इतर कंपन्यांनीही मान्सून ऑफरची घोषणा केली आहे.
सच्चिदानंद, प्रतिनिधी
पाटणा : उन्हाळ्यानंतर आता मान्सून सुरू झाला आहे. खरंतर हा मोसम एअरलाइन्स कंपन्यांसाठी मंदीचा असतो. ऑफ सीजनमध्ये मंदीचा असते. त्यामुळे आता प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. विमानप्रवासाच्या भाड्यावर विमान कंपन्यांनी आता 70 टक्क्यांपर्यंत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत.
प्रवाशांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय रुटवर विमानाभाड्याच्या दरात सूट देण्यात येत आहे. विस्ताराने 4 दिवसांचा सेल सुरू केला आहे. तर यासोबतच इंडिगो, एअर इंडिया सह इतर कंपन्यांनीही मान्सून ऑफरची घोषणा केली आहे.
advertisement
एअर इंडिया एक्स्प्रेस आणि इंडिगो या दोन्ही कंपन्यांनी गेल्या आठवड्यात मर्यादित कालावधीच्या तिकिटांची विक्री सुरू केली. तसेच एअर इंडिया एक्सप्रेसने 1,177 रुपयांपासून तिकीट दरात ऑफर दिली आहे. तर देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी 1,199 रुपयांपासून सर्व समावेशक भाडे जाहीर केले आहे. यासोबतच टाटा समूह नियंत्रित एअर इंडियाने 2,449 रुपयांपासून तिकीट दर ठेवले आहेत.
advertisement
success story : एकेकाळी 20 रुपये मिळवायलाही अडचण होती, आता आठवड्याला 2 हजार रुपये कमावतायेत या महिला
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर एअर इंडिया बिझनेस क्लासमध्ये 70% पर्यंत सूट देत आहे. तसेच नवीन राष्ट्रीय एअरलाइन्सपैकी एक असलेल्या Akasa Air कडून 30 सप्टेंबरपर्यंत सर्व फ्लाइट्सवर 20% सूट दिली जात आहे. मागील महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये दैनंदिन प्रवाशांच्या संख्येत 5-6% घट झाली आहे आणि एकूण आकडा 4.08 लाखांच्या जवळ आहे. दिल्या जाणाऱ्या या सूटमध्ये बदल होऊ शकतात किंवा मार्गानुसार बदल होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या मार्गानुसार तिकिटाची किंमत तपासून घ्यावी.
advertisement
Fruits For Skin : चेहऱ्यावरचा ग्लो वाढेल, फक्त दररोज खा ही 3 फळे, उन्हाळ्यातही चमकेल त्वचा
मागच्या वर्षी उन्हाळ्यात विमान तिकीटाच्या दरात विक्रमी वाढ झाली. मात्र, यंदा हे दर सामान्य राहिले. त्यात फारशी वाढ झालेली नाही. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या मते, जूनमध्ये शेड्यूल्ड फ्लाइट्स वार्षिक 8% वाढतील, यामध्ये मार्केट लीडर इंडिगो 9% अधिक फ्लाइट जोडेल. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यात PLF (पॅसेंजर लोड फॅक्टर) मध्ये घसरण दिसून आली आहे. गेल्यावर्षी जूनमध्ये हे प्रमाण 90 टक्क्यांच्या आसपास होते, मात्र, यंदा ते 81 टक्क्यांवर आले आहेत. त्यामुळे प्रमुख मार्गावरील स्पॉट भाडे कमी करण्यात आले आहे.
Location :
Patna,Bihar
First Published :
June 08, 2024 8:26 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
flight rates monsoon offer : पावसाळ्यात विमानाच्या तिकिटात भरघोस सूट, विमान कंपन्यांनी दिली ही ऑफर