मध्य रेल्वेने केला रेल्वे गाड्यांच्या क्रमांकात बदल, कोल्हापुरातील या गाड्यांचाही समावेश

Last Updated:

सध्या रेल्वे प्रशासनाकडून मोठी अपडेट समोर आली आहे. मध्य रेल्वे प्रशसनाकडून राज्यभरातील तब्बल 145 रेल्वेगाड्यांचे नंबर बदलण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज टर्मिनन्समधून धावणाऱ्या पाच रेल्वेगाड्यांचाही समावेश आहे.

मध्य रेल्वेने केला रेल्वे गाड्यांच्या क्रमांकात बदल
मध्य रेल्वेने केला रेल्वे गाड्यांच्या क्रमांकात बदल
कोल्हापूर : सध्या रेल्वे प्रशासनाकडून मोठी अपडेट समोर आली आहे. मध्य रेल्वे प्रशसनाकडून राज्यभरातील तब्बल 145 रेल्वेगाड्यांचे नंबर बदलण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज टर्मिनन्समधून धावणाऱ्या पाच रेल्वेगाड्यांचाही समावेश आहे. दरम्यान, हे क्रमांक बदलण्यासाठी बुधवारी रेल्वे प्रशासनाकडून काही सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र पुन्हा या सेवा प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार केल्या गेल्या आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाकडून विविध मार्गावरील रेल्वेगाड्यांचे क्रमांक बदलण्याचे काम सुरू आहे. नव्या बदललेल्या क्रमांकानुसार प्रवाशांना आता नवीन क्रमांकांचा वापर करावा लागणार आहे. प्रवाशांना आता ऑनलाइन बुकिंग करणे, आरक्षण, ऑनलाइनने गाड्यांची सद्य:स्थिती पाहण्यासाठी नव्या क्रमांकानुसार पाहावे लागणार आहे.
डेमू सातारा-कोल्हापूर 71423,
डेमू मिरज-कोल्हापूर 71423,
डेमू कोल्हापूर-मिरज 71728,
डेमू कोल्हापूर-सांगली 71430,
डेमू मिरज-कोल्हापूर 71429,
असे बदल्यात आलेले नवे क्रमांक मध्य रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत.
गाड्यांच्या क्रमांकात केलेल्या बदलामुळे यंत्रणा बंद !
रेल्वे प्रशासनाकडून गाड्यांच्या क्रमांकात बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रशासन उघडून काही काळ ऑनलाइन बुकिंग, तत्काळ आरक्षण, चार्ट प्रदर्शन, टच स्क्रीन, परतावा खिडकी अशा पूर्ण देणाऱ्या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. या सेवा 31 डिसेंबर 2024 च्या मध्यरात्रीपासून ते 1 जानेवारी रात्री 1:15 पर्यंत बंद ठेवल्या.
advertisement
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रवासी संघटनेकडून रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात यावा अशी मागणी होत होती. अखेर रेल्वे प्रशासनाकडून या मागणीची दखल घेत ठराविक रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात आलाय. मध्य रेल्वे प्रशासनाने बदल केलेल्या वेळेनुसार बुधवारपासून अंमलबजावणी सुरू झाली. कोल्हापुरातून सुटणाऱ्या 11 तसेच कोल्हापुरात येणाऱ्या 3 रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. यात सातारा-कोल्हापूर डेमूचा समावेश असून, बुधवारी पहिल्याच दिवशी सकाळी 9 वाजून 26 मिनिटांनी राजर्षी शाहू महाराज टर्मिनसवर दाखल झाली. सातारा-कोल्हापूर डेमू रेल्वेच्या वेळेत बदल करण्याची मागणी कोल्हापूर प्रवासी संघटनेने केली होती. ही रेल्वे कोल्हापुरात अर्धातास आधी सकाळी 9.26 वाजता आल्याने प्रवाशांंनी समाधान व्यक्त केले. सांगली, मिरज, जयसिंगपूर, हातकणंगले येथून दररोज कोल्हापुरात येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यामध्ये विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिकांचा समावेश असून, यापूर्वी ही रेल्वे सकाळी सव्वादहा वाजता स्थानकावर येत होती. त्यामुळे बहुतांशी जणांना कार्यालय, शाळा, कॉलेजमध्ये उशिरा पोहोचत होते.
advertisement
कोल्हापूर - पुणे डेमू : पहाटे 5 वाजताऐवजी पहाटे 5.10 वा.
कोयना एक्स्प्रेस : सकाळी 8.15 ऐवजी सकाळी 8.25 वा.
हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेस : सकाळी 9.10 ऐवजी सकाळी 9.35 वा.
कोल्हापूर-मिरज डेमू : सकाळी 10.30 ऐवजी सकाळी 10.25 वा.
कोल्हापूर-तिरूपती सकाळी 11.40 ऐवजी सकाळी 11.45 वा.
कोल्हापूर-अहमदाबाद दुपारी 1.15 ऐवजी दुपारी 1.30 वा.
advertisement
महाराष्ट्र एक्स्प्रेस दुपारी 2.45 ऐवजी दुपारी 2.50 वा.
कलबुर्गी एक्स्प्रेस दुपारी 3 ऐवजी दुपारी 3.05 वा.
कोल्हापूर-सांगली डेमू सायंकाळी 7.40 ऐवजी सायंकाळी 7.35 वा.
महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्री 8.50 ऐवजी रात्री 8.55 वा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
मध्य रेल्वेने केला रेल्वे गाड्यांच्या क्रमांकात बदल, कोल्हापुरातील या गाड्यांचाही समावेश
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement