कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! एसटीच्या 4300 बस तुमच्याचसाठी...
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
गेल्यावर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात साडेतीन हजार जादा बस चालवण्यात आल्या होत्या. यंदा प्रवाशांची मागणी वाढल्यानं 800 गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे, अशी माहिती एसटी महामंडळानं दिली.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : यंदा 7 सप्टेंबरला गणरायाचं आगमन होईल. गणेशोत्सवानिमित्त वाढीव एसटी गाड्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या भाविकांना अखेर दिलासा मिळाला आहे. यंदा गणेशोत्सवासाठी एकूण 4300 विशेष एसटी गाड्या चालवण्याचा निर्णय राज्य परिवहन (एसटी) महामंडळानं घेतला आहे.
अनेक चाकरमानी बाप्पाच्या स्वागताची तयारी करण्यासाठी लवकरच गावी जातात. याच कोकणवासीयांसाठी 2 ते 17 सप्टेंबरदरम्यान मुंबईसह ठाणे, पालघर विभागातून गाड्या चालवण्यात येणार आहेत.
advertisement
गेल्यावर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात साडेतीन हजार जादा बस चालवण्यात आल्या होत्या. यंदा प्रवाशांची मागणी वाढल्यानं 800 गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे, अशी माहिती एसटी महामंडळानं दिली. उत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत राहण्यासाठी महामंडळानं स्थानक आणि आगारांमध्ये वरिष्ठ कर्मचाऱ्यांना तैनात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. महामार्गावरील थांब्यांवर महिला आणि पुरुष प्रवाशांच्या सुविधेसाठी स्वच्छतागृहसुद्धा उभारण्यात येणार आहेत.
advertisement
इथं करा आरक्षण :
एसटी महामंडळाच्या आरक्षण केंद्रासह http://npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर विशेष गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध आहेत. त्या MSRTC Bus Reservation मोबाईल ॲपवरसुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 01, 2024 11:35 AM IST