बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी वेस्टर्न रेल्वेकडून स्पेशल गाड्या, आरक्षण कधीपासून?
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
यंदा 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी आहे. त्यानिमित्तानं रेल्वेकडून विशेष गाड्यांचं नियोजन करण्यात आलंय.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : दरवर्षी गणेशोत्सवासाठी भाविक मुंबईहून मोठ्या संख्येनं कोकणात जातात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, गाड्यांमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जातात. यंदा 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी आहे. त्यानिमित्तानं रेल्वेकडून विशेष गाड्यांचं नियोजन करण्यात आलंय.
मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेनंसुद्धा मुंबई सेंट्रल - ठोकूर, मुंबई सेंट्रल - सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस - कुडाळ, अहमदाबाद - कुडाळ या स्थानकांदरम्यान गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचं आरक्षण मिळालं नाही, त्यांच्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. आता पश्चिम रेल्वे मार्गानं कोकणात जाण्यासाठी आरक्षण करता येईल.
advertisement
- 09001 / 09002 मुंबई सेंट्रल - ठोकूर - मुंबई सेंट्रल साप्ताहिक विशेष
09001 विशेष गाडी मुंबई सेंट्रल इथून मंगळवार दिनांक 3, 10 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 09.30 वाजता ठोकूर इथं पोहोचेल. तर, 09002 विशेष गाडी ठोकूर इथून बुधवार दिनांक 4, 11 आणि 18 सप्टेंबर रोजी सकाळी 10.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 07.05 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.
advertisement
या गाडीचे मडगावपर्यंतचे थांबे : बोरिवली, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम, करमाळी आणि मडगाव
डब्यांची रचना : 1 फर्स्ट एसी, 5 श्री टायर एसी, 12 सेकंड स्लीपर, 4 जनरल आणि 2 एसएलआर, एकूण 24 डबे.
advertisement
- 09009 / 09010 मुंबई सेंट्रल - सावंतवाडी - मुंबई सेंट्रल
09009 विशेष गाडी मुंबई सेंट्रलहून दिनांक 2 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरपर्यंत मंगळवार वगळता दररोज दुपारी 12.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2.30 वाजता सावंतवाडीला पोहोचेल.
09010 विशेष गाडी सावंतवाडी इथून 3 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरपर्यंत बुधवार वगळता दररोज पहाटे 5.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 8.10 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.
advertisement
थांबे : बोरिवली, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ
डब्यांची रचना : 1 फर्स्ट एसी, 5 श्री टायर एसी, 12 सेकंड स्लीपर, 4 जनरल आणि 2 एसएलआर, एकूण 24 डबे.
- 09015 / 09016 वांद्रे टर्मिनस - कुडाळ - वांद्रे टर्मिनस साप्ताहिक विशेष
advertisement
09015 विशेष गाडी वांद्रे टर्मिनसहून गुरुवार दिनांक 5, 12 आणि 19 सप्टेंबर रोजी दुपारी 2.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5.40 वाजता कुडाळला पोहोचेल.
09016 विशेष गाडी कुडाळ इथून शुक्रवार दिनांक 6, 13 आणि 20 सप्टेंबर रोजी सकाळी 6.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9.30 वाजता वांद्रे टर्मिनस इथं पोहोचेल.
advertisement
थांबे : बोरिवली, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग.
डब्यांची रचना : 20 सेकंड सीटिंग, 1 एसएलआर, 1 ब्रेकव्हॅन, एकूण 22 LHB कोच.
- 09412 / 09411 अहमदाबाद - कुडाळ अहमदाबाद (साप्ताहिक) विशेष
09412 विशेष गाडी अहमदाबादहून दिनांक 3, 10 आणि 17 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.10 वाजता कुडाळला पोहोचेल.
09411 विशेष गाडी कुडाळ इथून दिनांक 4, 11, 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 वाजता अहमदाबादला पोहोचेल.
थांबे : अहमदाबाद, गोरातपूर, वडोदरा, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.
डब्यांची रचना : 1 फर्स्ट एसी, 5 थ्री टायर एसी, 12 सेकंड स्लीपर, 4 जनरल आणि 2 एसएलआर, एकूण 24 डबे.
- 09150 / 09149 विश्वामित्री - कुडाळ - विश्वामित्री (साप्ताहिक) विशेष
09150 विशेष गाडी विश्वामित्री इथून दिनांक 2, 9, 16 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.10 वाजता कुडाळला पोहोचेल.
09149 विशेष गाडी कुडाळ इथून दिनांक 3, 10, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 1 वाजता विश्वामित्री इथं पोहोचेल.
थांबे : भारूच, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.
डब्यांची रचना : 1 फर्स्ट एसी, 5 थ्री टायर एसी, 12 सेकंड स्लीपर, 4 जनरल आणि 2 एसएलआर, एकूण 24 डबे.
आरक्षण कुठं करावं?
या सर्व गणपती विशेष गाड्यांचं आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर 28 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 26, 2024 9:56 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी वेस्टर्न रेल्वेकडून स्पेशल गाड्या, आरक्षण कधीपासून?