खाजगी ट्रॅव्हल्सकडून अधिक तिकिटदर आकारल्या जातंय? कशी कराल तक्रार पाहा Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
खाजगी ट्रॅव्हल्सवाले अधिक तिकिटदर आकारात असतील तर तुम्ही या संदर्भात तक्रार करू शकतात.
बीड, 6 ऑक्टोबर : सण, उत्सवाच्या काळाला आता सुरुवात झाली आहे. गणेशोत्सव संपून आता नवरात्रीचे वेध लागले आहेत. त्यानंतर काहीच दिवसांत दिवाळी आहे. त्यामुळे या सणांना घरी जाण्यासाठी एसटी आणि रेल्वेत आरक्षण न मिळाल्याने अनेकांना खाजगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागतो. या दरम्यान प्रवाश्यांची गर्दी पाहता खाजगी कंपनी ट्रॅव्हल्सवाले तिकिटांच्या दरात मोठी वाढ करतात आणि यामुळे ग्राहकांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. परंतु खाजगी ट्रॅव्हल्सवाले अधिक तिकिटदर आकारात असतील तर तुम्ही या संदर्भात तक्रार करू शकतात.
कशी कराल तक्रार?
दसरा आणि दिवाळी सणासाठी आधीच सर्व एसटी आणि रेल्वेत आरक्षण फुल होते. अशा वेळी ज्या प्रवाशांना ऐनवेळी आपल्या गावाकडे जायचे आहे त्यांच्याकडून तिकिट दुपटीने घेतले जाते आणि नाईलाज म्हणून याच खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतो. जर अश्या खाजगी ट्रॅव्हल्सवाले आवाचे सव्वा तिकीट दर आकारत असतील तर तुम्ही तक्रार करू शकता, असं बीड येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने यांनी सांगितले.
advertisement
नोव्हेंबरनंतर देशातील या शहरात पेट्रोल-डिझेल गाड्यांची विक्री बंद, नेमकं काय होणार?
कुठला खाजगी ट्रॅव्हल कंपनी जर अधिक भाडे आकारत असेल तर ग्राहकाने तक्रार करता येते. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मौजे घोसापुरी फाटा नांमलगाव जालना रोड, बी येथे करावी किंवा dyrto.23-mh@gov.in किंवा या मेल आयडीवर देखील तुम्ही तक्रार करू शकता आणि तुमच्या तक्रारीचे निवारण अवघ्या काही वेळात करण्यात येईल,असंही स्वप्निल माने यांनी सांगितले.
advertisement
सुरक्षित वाहनात प्रवास करा
सध्याच्या घडीला सुरक्षित प्रवास हा खूप महत्त्वाचा भाग बनलेला आहे. ज्यावेळी प्रवासी खाजगी स्लीपर कोचमधून प्रवास करत असतील त्या वाहनांमध्ये अग्निशामक यंत्र आहे का तसेच इमर्जन्सी डोर उपलब्ध आहे का या गोष्टींची चाचपणी करावी. त्यासह एम परिवहन नावाच्या ॲप जर मोबाईलमध्ये डाउनलोड केले तर वाहनाचा नंबर या ॲपमध्ये अपलोड करतात त्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट दिसून येते आणि त्या खाजगी वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट जर ठीक असेल तरच ह्या बसने प्रवास करावा अन्यथा प्रवास करू नये जेणेकरून कुठलीही दुर्घटना घडणार नाही, असं स्वप्निल माने यांनी सांगितले.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
October 06, 2023 2:00 PM IST