तिरुपतीसाठी रेल्वेच्या 52 विशेष गाड्या, आपण बुकिंग केलंत का?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तिरुपतीला जाण्यासाठी रेल्वेच्या 52 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
मुंबई, 5 ऑक्टोबर: सणासुदीच्या काळात रेल्वेच्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यातच देवदर्शनासाठी अनेकजण रेल्वेने प्रवास करत असतात. त्यामुळेच रेल्वे प्रशासनाने तिरुपतीसाठी 52 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई - सोलापूर आणि सोलापूर - तिरुपती दरम्याने या साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
कसं असेल वेळापत्रक?
तिरुपतीसाठी सोडण्यात येणाऱ्या गाड्यांच्या लोकमान्य टिळक टर्मिनस - सोलापूर साप्ताहिक विशेष 26 फेऱ्या असतील. गाडी क्रमांक 01436 लोकमान्य टिळक टर्मिनस - सोलापूर विशेष 27 डिसेंबरपर्यंत (13 फेऱ्या) पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक 01435 सोलापूर - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष 26 डिसेंबर (13 फेऱ्या) पर्यंत वाढवण्यात आली आहे.
advertisement
सोलापूर ते तिरुपती गाडी
सोलापूर - तिरुपती साप्ताहिक विशेष 26 फेऱ्या असतील. गाडी क्रमांक 01437 सोलापूर - तिरुपती विशेष 28 डिसेंबर (13 फेऱ्या) पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक 01438 तिरुपती सोलापूर विशेष 29 डिसेंबर (13 फेऱ्या) पर्यंत चालवण्यात येणार आहे.
advertisement
तिकीट बुकिंग आणि थांबे
रेल्वेच्या या विशेष गाड्यांचे थांबे आहे तसेच राहणार आहेत. तर आरक्षण विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2023 11:57 AM IST