हिवाळ्यात धार्मिक स्थळांना भेट देण्याचा विचार करताय? पाहा रेल्वेचा भन्नाट स्वस्त प्लॅन

Last Updated:

महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना भेट देण्याची ही सुवर्णसंधी आहे.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर,11 डिसेंबर : हिवाळ्यात धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने एक अतिशय स्वस्त पॅकेज लॉन्च केले आहे, जे तुम्ही बुक करू शकता. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना भेट देण्याची ही सुवर्णसंधी आहे. यासाठी बुकिंगही सुरू झाले आहे.
IRCTC ने महाराष्ट्रातील शिर्डी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिकला भेट देण्यासाठी हे खास पॅकेज सुरू केले आहे. हे पॅकेज चार दिवस आणि तीन रात्रीसाठी 5230 रुपये आहे. अशा प्रकारे दैनंदिन खर्च 1307 रुपये होईल. पॅकेज बंगलोरपासून सुरू होते आणि शिर्डी येथे संपते. यासाठी दररोज बुकिंग करता येईल. 16 डिसेंबरसाठी बुकिंग सुरु झाली आहे . या पॅकेजमध्ये राहण्याची सोय, जेवण, रेल्वे प्रवास, धार्मिक स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक वाहतूक आणि विमा यांचाही समावेश आहे. या पॅकेजमुळे बंगलोरपासून प्रवास सुरू करू शकतात. यामध्ये स्लीपर आणि एसी अशा दोन्ही क्लासमध्ये प्रवास करता येतो.
advertisement
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी 14 वर्षाचा मुलगा मैदानात; यवतमाळ ते नागपूर करतोय स्केटिंग वारी
यामध्ये स्लीपर आणि एसी अशा दोन्ही क्लासमध्ये प्रवास करता येतो. एसी प्रवासासाठी 7690 रुपयांचे पॅकेज आहे. यामध्ये हॉटेलमधील एका खोलीत तीन लोक राहतील. जर दोन लोकांना राहायचे असेल तर तुम्हाला 8090 रुपये मोजावे लागतील आणि जर तुम्हाला एकटे राहायचे असेल तर तुम्हाला 10350 रुपये मोजावे लागतील. त्याचवेळी, स्लीपर क्लासने प्रवास केल्यानंतर, हॉटेलमध्ये दोन व्यक्ती एकटे राहिल्यास त्यांना अनुक्रमे 7890 आणि 5630 रुपये मोजावे लागतील. तीन जण तिथे राहिल्यास त्यांना 5230 रुपये द्यावे लागतील.
advertisement
का महागली गोरगरिबांची भाकरी? ही आहेत ज्वारीच्या दरवाढीची कारणे, Video
त्याचप्रमाणे माता वैष्णोदेवीसाठी वंदे भारत प्रवास करण्याचे पॅकेज आहे. हे एक रात्र आणि दोन दिवसांसाठी आहे, यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 7290 रुपये मोजावे लागतील. दिल्ली ते कटरा हा प्रवास रेल्वेने होईल. मंगळवार वगळता बुकिंग करता येईल. त्याचप्रमाणे माता वैष्णोदेवीसाठी वंदे भारत प्रवास करण्याचे पॅकेज आहे. हे एक रात्र आणि दोन दिवसांसाठी आहे, यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 7290 रुपये मोजावे लागतील. दिल्ली ते कटरा हा प्रवास रेल्वेने होईल. जर तुम्हाला सुद्धा हे बुकिंग करायचे असेल तर तुम्ही मंगळवार सोडून इतर दिवशी याचा बुकिंग करू शकता.
मराठी बातम्या/Travel/
हिवाळ्यात धार्मिक स्थळांना भेट देण्याचा विचार करताय? पाहा रेल्वेचा भन्नाट स्वस्त प्लॅन
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement