समुद्राच्या मध्यभागी जाऊन घेता येणार समुद्राचा अनुभव, जुहू चौपाटीवर कायाकिंग सुविधा सुरू, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
आतापर्यंत या चौपाटी फक्त आपण लांबून पाहत होतो. मात्र पहिल्यांदाच मुंबईमध्ये जुहू चौपाटीवर आपल्याला समुद्राच्या मध्यभागी जाऊन जुहूचा समुद्र अनुभव घेता येणार आहे.
निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई : मुंबई सर्वात जास्त प्रसिद्ध आहे ती म्हणजे अरबी समुद्रासाठी. मुंबईला भला मोठा अथांग असा अरबी समुद्राचा किनारा लाभला आहे. हा किनारा मुंबईची शोभा नेहमी वाढवत असतो. याच अरबी समुद्राला लाभलेल्या गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, वर्सोवा चौपाटी, आणि मढ चौपाटी अशा वेगवेगळ्या चौपाटी लाभल्या आहेत. आतापर्यंत या चौपाटी फक्त आपण लांबून पाहत होतो. मात्र पहिल्यांदाच मुंबईमध्ये जुहू चौपाटीवर आपल्याला समुद्राच्या मध्यभागी जाऊन जुहूचा समुद्र अनुभव घेता येणार आहे.
advertisement
मुंबईच्या प्रसिद्ध चौपाटी पैकी जुहू ही सर्वात जास्त गजबजलेली आणि मोठी चौपाटी मानली जाते. अंधेरी, विलेपार्ले आणि सांताक्रुज या तिन्ही रेल्वे स्थानकावरून जुहू चौपाटीला जाता येते. जुहू चौपाटीच्या विस्तारलेल्या परिसरात दररोज गर्दी असते. याच जुहू चौपाटीवर आता कायाकिंग ही सुविधा सुरू झाली आहे.
advertisement
कायाकिंग सुविधा प्रथमत मुंबईत सुरु झाली आहे. 10 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीसाठी कायाकिंग ही सुविधा सुरू झाली आहे. या सुविधेचे एका व्यक्तीचे 20 मिनिटांच्या स्लॉटचे दर 500 रुपये आहेत. कायाकिंगचा अनुभव घेताना तुमच्यासोबत दोन प्रशिक्षक असतात, तसेच कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यास जवळपासच्या परिसरात 30 सेकंदाच्या आत तुम्हाला बोट रेस्क्यू करण्यासाठी येते. तसेच उत्तम गुणवत्तेचे सेफ्टी जॅकेट देखील तुम्हाला कायाकिंग करताना दिले जाते.
advertisement
आतापर्यंत मुंबईकरांना जुहू चौपाटी फक्त किनाऱ्यावरून पाहता येत होती. मात्र आता समुद्राच्या मध्यभागी जाऊन आपल्याला जुहू परिसराचा आणि मुंबईचा एक आगळावेगळा अनुभव घेता येणार आहे. या सुविधेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे यांनी पहाटेच्या सूर्यास्ताचा देखील एक स्लॉट ठेवलेला आहे. या स्लॉटमध्ये तुम्हाला तुम्हाला सूर्य उगवतानाचा अद्भुत अनुभव देखील घेता येणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 26, 2024 3:54 PM IST
मराठी बातम्या/Travel/
समुद्राच्या मध्यभागी जाऊन घेता येणार समुद्राचा अनुभव, जुहू चौपाटीवर कायाकिंग सुविधा सुरू, Video