पर्यटनाच्या राजधानीत घ्या सुट्ट्यांचा आनंद, संभाजीनगरमधील 7 प्रसिद्ध ठिकाणे पाहिली का?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar Tourism: नव्या वर्षाच्या स्वागताला पर्यटनाच्या राजधानीत फिरण्याचा विचार करत असाल तर ही 7 ठिकाणे पाहिलीच पाहिजेत.
advertisement
अजिंठा लेणी: संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यात इ.स. पूर्व 2 रे शतक ते इ.स. 4 थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडातील अजिंठा लेणी आहेत. यात 29 बौद्ध लेणी आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरापासून 100 ते 110 कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. भारताची जागतिक पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या लेणी म्हणून अजिंठाची ओळख आहे.
advertisement
वेरूळ लेणी: छत्रपती संभाजी नगर शहरापासून 30 कि.मी. अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेणी आहेत. युनेस्कोने इ.स. 1983 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला. कैलास मंदिर हे स्थापत्यशास्त्रात अद्भुत नमुना मानला जातो.
advertisement
बीबी का मकबरा: या वास्तूला बांधण्यास 17 व्या शतकात सुरुवात झाल्याचे म्हटले जाते. ही वास्तू ताजमहलची प्रतिकृती आहे. 1657 साली औरंगजेबाची पत्नी दिलरासबानू बेगम हिचा मुलाला जन्म देताना मृत्यू झाला. तिला जिथं दफन करण्यात आलं. तिथेच नंतर हा बीबी का मकबरा उभारण्यात आला. शहरापासून 3 किमी अंतरावर हा मकबरा आहे.
advertisement
पानचक्की: रशियामधील गझनवाद येथून आलेले हजरत बाबा शहा मुसाफिर यांनी पाणचक्की बांधली. या ठिकाणी सरया (धर्मशाळा) मशीद पाण्यासाठी भला मोठा हौद बांधण्यात आलेला आहे. पानचक्की सुमारे 17 व्या शतकातील आहे. या ठिकाणावर येणारे पाणी शहराच्या बाहेरून तब्बल सहा किमीवरुन जमिनीच्या खालून एका नहरीद्वारे आणले जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement