इंजिनिअरला लागला लालपरीचा लळा; एसटीसाठी करतो असं काम अधिकारी करतात कौतुक
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मुंबईतील इंजिनिअरला लाल परी म्हणजेच एसटी बसचा लळा लागला आहे.
मुंबई, 03 नोव्हेंबर : प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता छंद असतो. प्रवास करणे विविध ठिकाणाची माहिती मिळवणे हा त्यापैकीच एक छंद. मात्र, हा छंद जोपासताना मुंबई येथे राहणाऱ्या आणि व्यवसायाने सॉफ्ट वेअर इंजिनिअर असलेल्या रोहित धेंडे या अवलियाला लाल परी म्हणजेच एसटी बसचा लळा लागला आहे. त्यामुळे तो स्वतः एसटीनेच प्रवास करतो आणि सहसा एसटीकडे न वळणाऱ्या लोकांना रोहित हा एसटीचा प्रवास कसा सुखकर होतो याबद्दलची माहिती देत आहे.
अनेक ठिकाणी भरवतो एसटीचे प्रदर्शन
रोहित अनेक ठिकाणी एसटीचे प्रदर्शन भरवतो. यामध्ये अनेक शालेय विद्यार्थी हे प्रदर्शन पाहण्यासाठी येतात. यामध्ये एसटीचे विविध मॉडेल तो ठेवतो. जुनी एसटी ते नवीन एसटी असा संपूर्ण एसटीचा प्रवास तो या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडताना दिसून येतो. वर्षातून दोन वेळा विविध ठिकाणी असे प्रदर्शन भरवले जाते. यामुळे एसटी मधील बदल लोकांपर्यंत पोहचेल आणि एसटीमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढेल, असे रोहितचे मत आहे. यासाठी त्याने बस फॉर अस या नावाची एक नोंदणीकृत संस्था सुरू केली असून वाहक आणि चालकांना देखील प्रोत्साहन देतो.
advertisement
एसटीच्या अनेक योजनांच्या माहितीसाठी यू ट्यूब चॅनल
सद्यास्थितीत समाजात समाजमाध्यमांचा अधिक बोलबाला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मागे पडू नये तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची सर्वांना माहिती मिळावी यासाठी रोहित धेंडे या एसटीप्रेमी प्रवाशाने अवलिया प्रवासी नावाने एक यू ट्यूब चॅनल सुरू केले आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ राबवत असलेल्या अनेक सेवासुविधांची माहिती या चॅनलवर देण्यात येते.
advertisement
प्रवाशांना करतो आवाहन
प्रवाशांनी सरकारी बसचा वापर अधिक करावा यामुळे प्रवासातील खर्च कमी होईल. तसेच सरकारी बसनासुध्दा याचा मोठा फायदा मिळेल आणि अधिक सुधारणा करण्यास मदत होईल. इतकेच नव्हे तर एका मार्गावर बससाठी अधिक गर्दी होत असल्यास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला फेऱ्या वाढवता येतील असा यामगचा हेतु असल्याचे रोहीतने याने सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2023 12:57 PM IST