Chikhaldara Tourist Spot: पावसाळ्यात जणू स्वर्गच, 3 हजार फुटावरून अनुभवा चिखलदऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य, पर्यटकांसाठी खास सेवा सुरू, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
चिखलदरा येथील नैसर्गिक सौंदर्य आता पर्यटकांना एखाद्या पक्षाप्रमाणे जमिनीपासून तीन हजार फूट वर जावून बघता येणार आहे. त्यासाठी पॅरामोटरिंगची सुविधा चिखलदरा येथे सुरू करण्यात आली आहे.
अमरावती: विदर्भाचे नंदनवन असणाऱ्या मेळघाटमधील चिखलदरा येथे पावसाळ्यात अनेक पर्यटक भेटी देतात. पावसाळ्यात चिखलदरा येथील नैसर्गिक सौंदर्य हे सगळ्यांनाच आकर्षित करण्यासारखं असते. हिरवेगार जंगल, खोल दऱ्या, उंच उंच पहाड आणि रिमझिम पाऊस सुरू असताना त्यातच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक याठिकाणी येतात. तसेच निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटो क्लिक करण्यासाठी देखील पर्यटकांची गर्दी वाढते. चिखलदरा येथील नैसर्गिक सौंदर्य आता पर्यटकांना एखाद्या पक्षाप्रमाणे जमिनीपासून तीन हजार फूट वर जाऊन बघता येणार आहे. त्यासाठी पॅरामोटरिंगची सुविधा चिखलदरा येथे सुरू करण्यात आली आहे.
वनविभागाच्या सहकाऱ्याने पॅरामोटरिंग सुरू
चिखलदरा येथे सुरू करण्यात आलेल्या पॅरामोटरिंगबाबत माहिती देताना पायलट आशिष तोमर सांगतात की, पावसाळा सुरू झाला की, चिखलदरा नैसर्गिक सौंदर्याने बहरून जातं. काही दिवसातच पर्यटकांची गर्दी याठिकाणी बघायला मिळते. चिखलदरा येथे येत असताना तो वळणदार रस्ता, पाण्याचे झरे, वरून पडणारा पाऊस यातूनच पर्यटकांना भरपूर आनंद मिळतो.
advertisement
तरीही चिखलदरा येथे पर्यटकांसाठी दरवर्षी नवनवीन गोष्टींची सुविधा केली जात आहे. भीमकुंड येथे साहसी पर्यटकांसाठी स्काय सायकलिंग सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर आता वनविभागाच्या सहकाऱ्याने चिखलदरा येथे पर्यटकांना आकर्षण असणाऱ्या पॅरामोटरिंगची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
advertisement
पॅरामोटरिंग पायलटला 4 वर्ष कामाचा अनुभव
चिखलदरा येथे अनेक साहसी पर्यटक भेट देतात. पॅरामोटरिंगमुळे आता त्यांना भीमकुंड येथील खोल दऱ्या, गाविलगड किल्ला, चिखलदरा शहर आणि मेळघाटचे जंगल हे सर्व उंच आकाशातून बघायला मिळणार आहे. वन विभागाने चिखलदरा येथे पॅरामोटरिंगची सुविधा सुरू केली आहे. याआधी मी पॅरामोटरिंग पायलटचे दोन वर्ष प्रशिक्षण घेतले आहे.
advertisement
मी मूळचा परतवाडा येथील आहे. पाँडिचेरी, जैसलमेर, हरिद्वार, अलिबाग आणि गोवा याठिकाणी पॅरामोटरिंग पायलट म्हणून काम करण्याचा चार वर्षाचा अनुभव माझ्याकडे आहे. त्यामुळे चिखलदरा येथील पॅरामोटरिंग सुरक्षित असणार आहे. चिखलदरा येथील नैसर्गिक सौंदर्य आकाशातून बघता येणार असल्याने साहसी पर्यटकांच्या आनंदात आता भर पडली आहे, असेही त्यांनी सांगितले.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
July 09, 2025 3:08 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
Chikhaldara Tourist Spot: पावसाळ्यात जणू स्वर्गच, 3 हजार फुटावरून अनुभवा चिखलदऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य, पर्यटकांसाठी खास सेवा सुरू, Video