वारकऱ्यांना दिलासा, सांगली-परळी एक्स्प्रेस नव्या वर्षातही धावणार, असं आहे वेळापत्रक
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
दहा महिन्यांपूर्वी सुरू झालेली सांगली ते परळी एक्स्प्रेस गाडी नव्या वर्षातही कायम राहणार आहे. यामुळे सांगली शहर आणि पश्चिम भागातील वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली : दहा महिन्यांपूर्वी सुरू झालेली सांगली ते परळी एक्स्प्रेस गाडी नव्या वर्षातही कायम राहणार आहे. यामुळे सांगली शहर आणि पश्चिम भागातील वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पंढरीच्या रेल्वेवारीचा आनंद नव्या वर्षातही अनुभवास येणार असून, रेल्वेने पूर्वीचेच वेळापत्रक कायम ठेवले आहे.
सांगली आणि परिसरातील वारकऱ्यांचा सांगली रेल्वेस्थानकावरून दररोज धावणाऱ्या सांगली-परळी एक्स्प्रेसला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सांगली स्थानकावरून दररोज सांगली-परळी एक्स्प्रेस सुरू आहे. या रेल्वे गाडीची पहिली आषाढी एकादशी जल्लोषात विठ्ठलनामाच्या गजरात साजरी करण्यात आली होती. दररोज रात्री साडेआठ वाजता सांगली स्थानकातून ही रेल्वे गाडी सुटते. या गाडीचा तिकीट दर 65 रुपये आहे. नव्या वर्षात रेल्वे प्रशासनाने ही गाडी कायम ठेवल्याने प्रवाशांना पंढरीच्या वारीचा आनंद आता पुरेपूर लुटता येणार आहे.
advertisement
जनरल तिकिटे उपलब्ध
परळी-सांगली किंवा सांगली-परळी ही गाडी जनरल डब्यांची असल्याने स्थानकात दोन तासांपूर्वीपासून तिकिटे उपलब्ध होतात.
रोज रात्री 8:30 वाजता सांगलीतून गाडी क्रमांक 11412 सांगली-परळी एक्स्प्रेस धावते. ती पंढरपुरात रात्री 11 वाजता पोहोचते.
advertisement
पंढरपूरहून सांगलीला परतीचा प्रवास
पंढरपूर स्थानकावरून दररोज दुपारी 2:30 वाजता गाडी क्रमांक 11411 परळी-सांगली एक्स्प्रेस गाडी आहे. सांगलीत ती सायंकाळी 6:50 ला पोहोचते.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
December 31, 2024 6:35 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
वारकऱ्यांना दिलासा, सांगली-परळी एक्स्प्रेस नव्या वर्षातही धावणार, असं आहे वेळापत्रक