वासोटा किल्ला पर्यटकांसाठी 3 दिवस राहणार बंद, पाहा कारण काय?

Last Updated:

Vasota Fort: पर्यटकांना भुरळ घालणारा कोयना अभयारण्यातील वासोटा किल्ला पर्यटकांसाठी 3 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागताला या किल्ल्यावर जाता येणार नाही.

वासोटा किल्ला पर्यटकांसाठी 3 दिवस राहणार बंद, पाहा कारण काय?
वासोटा किल्ला पर्यटकांसाठी 3 दिवस राहणार बंद, पाहा कारण काय?
सातारा – एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन नवर्षाचं स्वागत करण्याचा अनेकांचा प्लॅन असतो. सातारा जिल्ह्यातील वनदुर्ग वासोटा हा अनेकांची पसंती असते. पण यंदा वर्षाअखेर वासोटा किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.  वासोटा किल्ल्यावरील पर्यटनास 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बामणोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांनी याबाबत माहिती दिलीये.
निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्ससह पर्यटकांना खुनावणारा वासोटा किल्ला नेहमीच आकर्षणाचं केंद्र असतो. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात कोयना अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गसंपन्न गाभा क्षेत्रात हा किल्ला वसला आहे. त्यामुळे या किल्ल्याची ट्रेकर्स, दुर्गप्रेमी, निसर्गप्रेमींसह पर्यटकांना कायमच भुरळ पडते. सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.
advertisement
वासोटा किल्ल्यावर जाण्यास 3 दिवस बंदी
सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक घराबाहेर पडतात. वासोटा किल्ला वन्यजीव विभागाच्या गाभा क्षेत्रात येत असल्याने या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे निसर्गसंपदेला कोणतीही हानी पोहोचू नये, यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कोयना जलाशयातून पर्यटक वाहतूक करणाऱ्या बोटिंग संस्थांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
advertisement
तर कारवाई होणार
30 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात वासोटा किल्ला तसेच अभयारण्यात फिरण्यास बंदी असणार आहे. या काळात वासोटा किल्ला तसेच अभयारण्य परिसरात कोणीही आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बामणोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी बाठे यांनी दिला आहे.
थंडीच्या दिवसांत वासोटा पर्यटकांनी फुल्ल !
थंडीच्या दिवसात पर्यटक, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमी, अभ्यासक मोठ्या संख्येने वासोटा किल्ल्याला भेट देत असतात. या भागात एकीकडे कोयना अभयारण्य असून दुसरीकड व्याघ्र प्रकल्प आहे. सध्या थंडीची चाहूल लागल्याने वासोटा किल्ला पाहण्यासाठी शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटक बामणोली, शेंबडी, मुनावळे या संपूर्ण परिसरामध्ये आदल्या दिवशी मुक्कामासाठी गर्दी करत आहेत. तसेच हॉटेल, टेन्ट बुकिंग आठवडाभर अगोदरच फुल होत होते. त्या दृष्टीने प्रशासनाने हा महत्वाचा निर्णय घेतला असून 3 दिवस वासोटा पर्यटकांसाठी बंद राहील.
मराठी बातम्या/Travel/
वासोटा किल्ला पर्यटकांसाठी 3 दिवस राहणार बंद, पाहा कारण काय?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement