श्रावणात करा एसटी संगे तीर्थाटन! अर्ध्या तिकीटात त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गडावर देवदर्शन

Last Updated:

एसटीकडून श्रावण महिन्यात खास तीर्थाटन योजना राबवण्यात येतेय. या अंतर्गत राज्याच्या विविध भागांतून एसटी बसने भाविकांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटन करता येईल.

श्रावणात करा एसटी संगे तीर्थाटन! अर्ध्या तिकीटात त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गडावर देवदर्शन
श्रावणात करा एसटी संगे तीर्थाटन! अर्ध्या तिकीटात त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गडावर देवदर्शन
नाशिक: हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. याच महिन्यात निसर्गही बहरलेला असतो. त्यामुळे अनेकजण धार्मिक आणि निसर्ग पर्यटनासाठी बाहेर पडतात. धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या श्रावणात अनेकांची पाऊले हळूहळू महादेवाच्या तीर्थक्षेत्रांकडे वळतात. त्यामुळे भाविकांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 'एसटी संगे तीर्थाटन' ही खास योजना सुरू केलीय. त्याचा फायदा अनेकांना होणार आहे.
एसटीकडून श्रावण महिन्यात खास तीर्थाटन योजना राबवण्यात येतेय. या अंतर्गत राज्याच्या विविध भागांतून एसटी बसने भाविकांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटन करता येईल. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात प्रवास उपलब्ध असणार आहे. तर अमृत ज्येष्ठ योजनेतून वयोवृद्धांना मोफत प्रवासाची सोय मिळणार आहे.
advertisement
दरम्यान, देशभरातील शिवभक्त नाशिक जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरला येत आहेत. त्र्यंबकेश्वरला आलेले भाविक शिर्डी आणि सप्तशृंगी गडावरही हजेरी लावतात. एसटीचा उपक्रम असला तरी भाविकांमुळे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी बाजारपेठाही फुललेल्या आहेत. तेसेच तेथील व्यापाऱ्यांनाही चांगले दिवस आल्याचे चित्र आहे.
कोणत्या आगारातून व्यवस्था
एसटी संगे तीर्थाटन योजनेतून राज्यातील विविध आगारातून बससेवा उपलब्ध आहे. नाशिकमधील जुन्या सीबीएस स्थानकातून त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत. महामार्ग स्थानक येथून शिर्डीला जाण्यासाठी महामंडळाच्या बस ठरलेल्या वेळेत उपलब्ध असणार आहेत. श्रावण महिन्यामुळे त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी जादा बसचीही सोय करण्यात आलीये.
view comments
मराठी बातम्या/Travel/
श्रावणात करा एसटी संगे तीर्थाटन! अर्ध्या तिकीटात त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गडावर देवदर्शन
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement