सोलापूरहुन मुंबई अन् गोव्याला विमानाने जाता येणार, तिकीटही जाहीर, किती पैसे लागणार?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
solapur to mumbai goa flight - या नव्या सेवेमुळे सोलापूरकरांना विमान प्रवासाचा जलद आणि आरामदायी पर्याय मिळणार आहे. सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी फ्लाय91 कंपनीच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात इ-मेलद्वारे माहिती मागितली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर - सोलापूर जिल्हावासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-गोवा या थेट हवाई मार्गांचे फ्लाय91 कंपनीचे तिकीट दर जाहीर झाले असून, हे दर स्वस्त आणि प्रवाशांच्या बजेटमध्ये बसणारे आहेत. या नव्या सेवेमुळे सोलापूरकरांना विमान प्रवासाचा जलद आणि आरामदायी पर्याय मिळणार आहे. सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी फ्लाय91 कंपनीच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात इ-मेलद्वारे माहिती मागितली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
advertisement
सोलापूर ते मुंबई :
सोलापूर ते मुंबई थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त 1488 रुपयांपासून सुरू होतो. विविध स्लॅबमध्ये दर वाढत जातात, जे प्रवाशांच्या मागणी आणि उपलब्धतेनुसार ठरवले जातात. उच्चतम दर 9584 रुपयांपर्यंत आहे. अतिरिक्त शुल्कात 217 रुपये युजर डेव्हलपमेंट फी (UDF), 236 रुपये विमान सुरक्षा शुल्क (ASF) आणि 5% GST यांचा समावेश होतो.
advertisement
सोलापूर ते गोवा (मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ) :
सोलापूर ते गोवा थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त 689 रुपये आहे. या मार्गावरही स्लॅबनुसार दर 8785 रुपयांपर्यंत जातात. अतिरिक्त शुल्कातही UDF, ASF, आणि GST चा समावेश आहे, जो मुंबई मार्गाप्रमाणेच आहे.
प्रवाशांसाठी स्वस्त व सोयीस्कर पर्याय :
सोलापूर विमानतळाच्या या सेवेमुळे प्रवाशांना जलद आणि किफायतशीर प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. या मार्गावर महाराष्ट्र शासनाच्या व्हायबिलिटी गॅप फंडिंग आणि 'रीजनल कनेक्टिव्हिटी योजना' (RCS) अंतर्गत विमान सेवा देण्याचा प्रस्ताव केंद्रात असल्याने काही मार्गांवर फक्त GST लागू होतो, ज्यामुळे प्रवास अधिक परवडणारा ठरतो.
advertisement
महत्त्वाचे मुद्दे -
मुंबई ↔ सोलापूर
मुंबई ते सोलापूर
निघण्याची वेळ : सकाळी 11:55
पोहोचण्याची वेळ: दुपारी 1:45
सोलापूर ते मुंबई
निघण्याची वेळ: सकाळी 9:40
पोहोचण्याची वेळ: सकाळी 11:20
गोवा ↔ सोलापूर
गोवा ते सोलापूर
निघण्याची वेळ: सकाळी 8:00
पोहोचण्याची वेळ: सकाळी 9:10
सोलापूर ते गोवा
निघण्याची वेळ: दुपारी 2:15
पोहोचण्याची वेळ: दुपारी 3:30
advertisement
सोलापूरच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल असुन कंपनीच्या वतीने लवकरच बुकींग सुरू होणार असल्याचा इ-मेल मिळाला आहे. सोलापूर विमानतळाच्या या नव्या सेवांमुळे धार्मिक तथा स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल आणि व्यवसायिक प्रवाशांसाठीही ही सेवा वरदान ठरणार असल्याचा आशावाद सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी व्यक्त केला. सदर दर अंतिम नसुन कंपनीच्या वतीने प्राप्त झालेली माहितीचे दरपत्रक नोव्हेंबर महिन्याचे असुन पुढिल महिन्यात दर कदाचित बदलुही शकता.
advertisement
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
November 25, 2024 6:15 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
सोलापूरहुन मुंबई अन् गोव्याला विमानाने जाता येणार, तिकीटही जाहीर, किती पैसे लागणार?