कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त नगर रस्त्यावर वाहतूक बदल, पर्यायी मार्ग कोणते?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
कोरेगाव भीमा इथे 1 जानेवारी 2025 ला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.
पुणे : कोरेगाव भीमा इथे 1 जानेवारी 2025 ला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंगळवारी 31 डिसेंबर दुपारी दोन वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. अभिवादन कार्यक्रमास राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील अनुनायी उपस्थित राहणार असल्याने वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.
नगर रस्त्यावरील वाहतूक बदल 1 जानेवारी 2025 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे पुण्याकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरून वळून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुरमार्गे नगर रस्त्याला लागावे. सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरून विश्रांतवाडीकडे जावे. तेथून आळंदी आणि चाकणकडे जावे. मुंबईकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे अहिल्यानगरकडे जावे. मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे अहिल्यानगरकडे जावे.
advertisement
वाहने लावण्याची ठिकाणे
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायींसाठी प्रशासनाने वाहने लावण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहेत. लोणीकंद येथील आपले घर, बौद्ध वस्ती, मोनिका हॉटेलशेजारी, ओमसाई हॉटेलच्या पाठीमागे, तुळापूर फाटा स्टफ कंपनीशेजारी, तुळापूर रस्ता वाय पॉइंट, हॉटेल गणेश मिसळजवळ, तुळापूर रस्ता हॉटेल शेतकरी मिसळ शेजारी, निसर्ग लॉज शेजारी, फुलगाव सैनिकी शाळा मैदान, थेऊर रस्ता, सोमवंशी अकॅडमी शेजारी, खंडोबाचा माळ, पेरणे फाटा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथे वाहने पार्क करावी.
advertisement
अवजड वाहनांना बंदी
शहरात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. लोणी काळभोर परिसरातील थेऊर फाटा, खडकीतील हॅरिस पूल, विश्रांतवाडीतील बोपखेल फाटा, बाणेरमधील राधा चौक, सिंहगड रस्ता भागातील नवले पूल, कात्रज चौक, कोंढव्यातील खडी मशीन चौक, फुरसुंगीत मंतरवाडी फाटा, मरकळ पूल येथून शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक बदलाबाबतचे माहिती देणारे फलक ठिकठिकाणी लावण्यात येणार असून, वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 30, 2024 4:40 PM IST
मराठी बातम्या/Travel/
कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त नगर रस्त्यावर वाहतूक बदल, पर्यायी मार्ग कोणते?