ट्रेकर्ससाठी गुड न्यूज! 40 वर्षानंतर पर्वतारोहणासाठी खुलं होणार सर्वात अवघड शिखर
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
साहसी पर्यटकांसाठी म्हणजेच ट्रेकर्ससाठी एक खूशखबर आहे. उत्तराखंडमधील सर्वात अवघड मानलं जाणारं नंदादेवी शिखर पर्वतारोहणासाठी पुन्हा सुरू होणार आहे.
मुंबई: राज्यातील साहसी पर्यटकांसाठी खूशखबर आहे. गिर्यारोहणासाठी अवघड मानला जाणारा उत्तराखंडमधील नंदादेवी शिखर गिर्यारोहणासाठी पुन्हा खुला करण्यात येणार आहे. गेल्या चार दशकांपासून हा पर्वत गिर्यारोहकांसाठी बंद करण्यात आला होता. आता उत्तराखंड सरकार साहसी पर्यटानाला चालना देण्यासाठी नंदा देवी पर्वत पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहे. इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशन, पर्यटन आणि वन विभाग यासाठी प्रस्ताव तयार करत आहेत.
उत्तराखंडमधील पर्यटन सचिव धीरज सिंह गरब्याल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक झाली. यामध्ये साहसी पर्यटन आणि पर्वतारोहण विस्तारावर चर्चा झाली. बैठकीत इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशनने नंदा देवी शिखर पर्वतारोहणासाठी खुला करण्याचा प्रस्ताव मांडला. 1980 पासून नंदा देवी शिखरावर पर्वतारोहणावर बंदी आहे.
advertisement
हिवाळ्यात इको टुरिझमला प्रोत्साहन
पर्यटन विभागाने हिवाळ्यातील ऑक्टोबर ते मार्च या काळात पर्यटकांसाठी गंगोत्री राष्ट्रीय उद्यान खुले करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या काळात हिम बिबट्या सर्वाधिक आढळतात. यासाठी लडाखचे हेमिस राष्ट्रीय उद्यान एक मॉडेल म्हणून सादर केले जाणार आहे. हे राष्ट्रीय उद्यान हिम बिबट्यांसाठी प्रसिद्ध असून पर्यटकांसाठी वर्षभर खुले असते.
ट्रेकिंगसाठी नोंदणी प्रक्रिया सुलभ करणार
वन विभागाने एकात्मिक एक खिडकी पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील विविध ट्रेकवर ट्रेकिंगसाठीच्या पोर्टलवर काम सुरू आहे. यामध्ये नोंदणी प्रक्रिया देखील सुलभ केली जात आहे. तसेच ट्रेकिंग मार्गांच्या क्षमतेचं मूल्यांकन केलं जाणार असून ट्रेकर्सची संख्या देखील निश्चित केली जाणार आहे.
advertisement
साहसी पर्यटकांसाठी खास मेळावा
इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशनचे अध्यक्ष कर्नल विजय सिंह यांनी दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील साहसी पर्यटन मेळावा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. यामध्ये, साहसी पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व टूर ऑपरेटर, भागधारक आणि प्रतिनिधींना एकाच व्यासपीठावर आणता येणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात देखील साहसी पर्यटकांची संख्या मोठी आहे. अनेकांनी सह्याद्रीसोबतच हिमालयातील शिखरे देखील पादाक्रांत केली आहेत. आता उत्तराखंडमधील अवघड मानले जाणारे नंदादेवी शिखर चार दशकांनी सुरू होत आहे. त्यामुळे ट्रेकर्सना वेगळी संधी निर्माण होणा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 17, 2025 2:11 PM IST
मराठी बातम्या/Travel/
ट्रेकर्ससाठी गुड न्यूज! 40 वर्षानंतर पर्वतारोहणासाठी खुलं होणार सर्वात अवघड शिखर