दररोज रेल्वेनं प्रवास करता, तरी 'या' पट्ट्यांचा अर्थ माहित नाही? 1 दिवशी दंड भरावा लागेल

Last Updated:

रेल्वे गाड्यांवरच्या या पट्ट्यांमागे महत्त्वाचा अर्थ दडलेला असतो. जर त्याबाबत प्रवाशांकडून चूक झाली, तर मात्र दंड भरावा लागतो.

या पट्ट्यांचा काहीतरी अर्थसुद्धा असू शकतो, याचा कधी तुम्ही विचार केलाय का?
या पट्ट्यांचा काहीतरी अर्थसुद्धा असू शकतो, याचा कधी तुम्ही विचार केलाय का?
शिखा श्रेया, प्रतिनिधी
रांची : लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहेच, शिवाय भारतीय रेल्वेच्या सेवेमुळे देशभरात सर्वत्र सुखाचा प्रवास होतो. तुम्ही निरीक्षण केलं असेल तर भारतीय रेल्वे गाड्या या साधारण निळ्या, पिवळ्या किंवा लाल रंगाच्या असतात. तर, रेल्वेच्या काही डब्यांवर पिवळ्या, पांढऱ्या किंवा निळ्या रंगांच्या पट्ट्या असतात. आपण या पट्ट्या सर्रास पाहतो, परंतु या पट्ट्यांचा काहीतरी अर्थसुद्धा असू शकतो, याचा कधी तुम्ही विचार केलाय का?
advertisement
खरंतर रेल्वे गाड्यांवरच्या या पट्ट्यांमागे महत्त्वाचा अर्थ दडलेला असतो. जर त्याबाबत प्रवाशांकडून चूक झाली, तर मात्र दंड भरावा लागतो. झारखंडची राजधानी असलेल्या रांचीच्या रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी निशांत कुमार यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
निशांत यांनी सांगितलं की, रेल्वेच्या ज्या डब्यांवर पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असतात, तो डबा दिव्यांग आणि आजारी प्रवाशांसाठी आरक्षित असतो. या डब्यावर सीट आणि टॉयलेटचं चित्रसुद्धा पाहायला मिळतं. तुम्ही अगदी ठणठणीत असाल आणि या डब्यात चढलात तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
रेल्वेच्या काही डब्यांवर हिरव्या रंगाच्या पट्ट्या असतात. याचा अर्थ ते डबे महिलांसाठी आरक्षित असतात. त्यामुळे पुरुष प्रवासी चुकून जरी या डब्यात चढले तरी त्यांना दंड भरावा लागतो. तसंच रेल्वेच्या डब्यांवर पांढऱ्या पट्ट्या असणं म्हणजे तो जनरल डबा असतो. तुम्ही जनरल तिकीट काढून या डब्यातून प्रवास करू शकता. दरम्यान, तुम्ही व्यवस्थित निरिक्षण केलं असल्यास करड्या रंगावर लाल रंगाच्या रेषा ही लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्याची ओळख असते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
दररोज रेल्वेनं प्रवास करता, तरी 'या' पट्ट्यांचा अर्थ माहित नाही? 1 दिवशी दंड भरावा लागेल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement