लाडक्या बहिणींना MTDC च्या रिसॉर्टमध्ये 50 टक्के ऑफ, काय आहे ऑफर?

Last Updated:

Womens Day: महिला दिनानिमित्त सरकारकडून लाडक्या बहिणींना खास गिफ्ट जाहीर करण्यात आलंय. एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये महिलांना 50 सवलत मिळणार आहे.

महिला दिनानिमित्त 1 ते 8 मार्च या काळात महिलांसाठी एमटीडीसी रिसॉर्टमध्ये 50 टक्क
महिला दिनानिमित्त 1 ते 8 मार्च या काळात महिलांसाठी एमटीडीसी रिसॉर्टमध्ये 50 टक्क
मुंबई: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींसाठी खास गिफ्ट जाहीर करण्यात आलंय. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (MTDC) राज्यातील महिलांसाठी खास योजना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार महिला पर्यटकांना 1 ते 8 मार्च 2025 या काळात एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. ‘आई’ महिला केंद्रीत/ लिंग समावेशक पर्यटन धोरणांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलीये.
एमटीडीसीने ‘आई’ हे महिला केंद्रित पर्यटन धोरण अंमलात आणले आहे. महिला पर्यटकांना अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि संस्मरणीय प्रवास करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 2024 मध्ये एमटीडीसीच्या महिला दिन विशेष सवलतीला देखील महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. 1500 हून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन 2025 मध्ये देखील ही योजना राबविण्यात येणार आहे. महिला पर्यटकांना www.mtdc.com या वेबसाईटवर जाऊन सवलतीचा लाभ घेता येईल, असेही पर्यटनमंत्री देसाई यांनी सांगितले.
advertisement
महिला पर्यटकांना 30 दिवसांची विशेष सवलत
महिला दिनानिमित्त महिला पर्यटकांना 1 ते 8 मार्च 2025 या काळात विशेष सवलत देण्यात आली आहे. तर वर्षभरातील 22 दिवस ही सवलत असते. त्यामुळे वर्षभरात एकूण 30 दिवस महिलांना 50 टक्के सवलत असून इतर 22 दिवसांची माहिती एमटीडीसीच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. एमटीडीसीच्या पर्यटन स्थळांवर महिला बचत गटांसाठी स्टॉल्सची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच महिला पर्यटकांसाठी विशेष साहसी आणि सांस्कृतिक उपक्रमांचं देखील आयोजन केलं जाणार आहे.
advertisement
हेरिटेज वॉक, साहसी पर्यटन, शैक्षणिक सहली आणि पर्यटन प्रशिक्षण, महिला गाईड्स आणि जलपर्यटन प्रशिक्षकांना संधी देण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी विशेष खेळ आणि मनोरंजन कार्यक्रम देखील असणार आहत.
मराठी बातम्या/Travel/
लाडक्या बहिणींना MTDC च्या रिसॉर्टमध्ये 50 टक्के ऑफ, काय आहे ऑफर?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement