किचनमध्ये देवघर करत असाल तर 'या' गोष्टींची घ्या काळजी

Last Updated:

किचनमध्ये देवघर असावं का? ते किचनमध्ये असेल तर कशा पद्धतीचं असावं? हे माहिती आहे?

+
News18

News18

पुणे, 2 ऑगस्ट : आपलं घर सुंदर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. घराचा प्लॅन करण्याआधीत देवघराची जागा निश्चित केली जाते.  घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते, असं मानलं जातं. सध्याच्या पद्धतीनुसार अनेकजण देवघर वेगळ्या रुममध्ये बांधतात. वेगळी रुम शक्य नसेल तर काही जण हॉल, किचनमध्ये देवासाठी जागा निश्चित केली जाते. किचनमध्ये देवघर असावं का? ते किचनमध्ये असेल तर कशा पद्धतीचं असावं याबाबतची माहिती पुण्यातले वास्तूतज्ज्ञ कुलदीप जोशी यांनी दिलीय.
'वास्तूशास्त्रानूसार स्वयंपाकघर हेच देवांचे पवित्र स्थान आहे. कारण, स्वयपाकघरातून आपल्याला आरोग्य, चव आणि सौंदर्य मिळवता येते. त्यावेळी तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर वास्तुच्या काही नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
किचनमध्ये देवघर तयार करत असताना त्याला लाकडाचा किंवा मार्बलचा आडोसा असणे खूप महत्वाचे आहे. अनेक जण  स्वयंपाक घरात देवघर नको म्हणून बेडरूममध्ये देवघर करतात. त्यामुळे त्याचा परिणाम पतिपत्नीच्या नात्यावर होताना दिसतो तुम्ही स्वयंपाकघरात मंदिर बांधत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्येकडे ठेवावी. या दिशेमध्ये शुभ प्रभाव पडतो आणि यामुळे चांगली आणि सकारात्मक ऊर्जादेखील मिळते. वास्तूनुसार या दिशेला मंदिर बांधल्यास सौभाग्य आणि लाभ मिळतो,' असे जोशी यांनी स्पष्ट केलं.
advertisement
देवघरात 'या' गोष्टी नको
अनेकदा आपण देवघर अगदी टापटीप सुंदर ठेवतो. पूजाअर्चा सर्व काही अगदी व्यवस्थित करतो पण देवघराच्या वरती आपला खूप पसारा असतो. सुकलेल्या फुलांच्या माळा, काडेपेटी या वस्तू देवघरात असतात. देवघरावर या वस्तू ठेवू नयेत. प्राचीन मूर्तींचे भग्न अवशेष देखील ठेवू नयेत. त्याचबरोबर एकाच देवाचे डबल फोटो किंवा मूर्ती असू नयेत. अनेकदा आपल्याकडं गणपतीच्या जास्त मूर्ती असतात. त्या सर्व मूर्ती देवघरात न ठेवता घरातल्या वेगळ्या जागेवर ठेवा असा सल्ला जोशी यांनी दिलाय.
advertisement
(या बातमीत व्यक्त झालेली मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक मतं आहेत. News18 मराठी याची कोणतीही हमी देत नाही.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
किचनमध्ये देवघर करत असाल तर 'या' गोष्टींची घ्या काळजी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement