वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात? मग या टिप्स नक्कीच फॉलो करा
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
वजन कमी करायचंय? तर पावसाळ्यात कसा असावा आहार? पाहा आहार तज्ज्ञांचा सल्ला..
वर्धा, 1 ऑगस्ट: तुमचे वजन वाढते आहे का? तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न आहात का ? सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या काळात वजन कमी करायचा असेल तर आहार तज्ज्ञांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही फॉलो करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आहार घेताना कोणता आहार घ्यावा आणि कोणत्या पदार्थांचं सेवन टाळावं? ते वर्धा येथील बीएससी फूड अँड न्यूट्रिशन डीएचएमएस डॉक्टर सरोज दाते यांच्याकडून जाणून घेऊयात.
तळलेले पदार्थ टाळाच
पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यात तुमच्या घरात तळलेले पदार्थ बनविले जात असतील तर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तेलकट पदार्थ देखील फार कमी प्रमाणात खाणं गरजेचं आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे घरात भजी, बटाटावडा, बटाटा भजी किंवा विविध तळलेली पदार्थ बनविली जातातच. अशावेळी पोट भरून तळलेले पदार्थात खाल्ले जातात. वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा थोडसं खाल्लं तर हरकत नाही. मात्र जास्त प्रमाणात तेलकट पदार्थ खाल तर वजन नियंत्रणात ठेवू शकत नाही, असं दाते सांगतात.
advertisement
गोड पदार्थही खाण्यावर मर्यादा ठेवा
वजन कमी करण्यासाठी तेलकट तसेच गोड पदार्थ खाण्यावर देखील मर्यादा असणं गरजेचं आहे. सण उत्सवाचे दिवस असतात आणि यामध्ये अनेक गोड पदार्थ बनवली जातात. मात्र, हे गोड पदार्थ खाण्यावर मर्यादा असणे गरजेचे आहे. तसेच अनेकांना जास्त प्रमाणात चहा पिण्याची ही सवय असते. हे वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. कुठलेही गोड पदार्थ प्रमाणात खाल्ले तर वजनही नियंत्रणात राहतं, असा सल्ला गोड खाणाऱ्यांना आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्यांना आहार तज्ञ देतात.
advertisement
भरपूर पाणी प्या
वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणे ही गरजेच आहे. कधी कधी जेवण कमी पाणी जास्त पिण्याचा सल्ला आहार तज्ज्ञ देतात. सोबतच पावसाळ्याचे दिवस असल्याने दूषित पाणी सेवन टाळण्यासाठी पाणीही उकळून पिणं गरजेचं आहे, असा सल्ला आहार तज्ज्ञ देतात. पावसाळ्यात वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या महत्त्वाच्या टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
August 01, 2023 1:01 PM IST