Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या दिवशी पार्लरमध्ये जायला वेळ नाही? घरीच करा सोप्या पद्धतीने हेअरस्टाईल, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
वटपौर्णिमेला महिलांना तयारी करायची असल्याने कोणाकडेच जास्त वेळ नसतो. अशावेळी स्वतःच्या हातानेच हेअरस्टाईल करायची हा पर्याय राहतो. तर तेव्हा स्वतःच्या हातानेच कोणत्या हेअरस्टाईल आपण करू शकतो, ते माहीत करून घ्या.
अमरावती: वटपौर्णिमा म्हणजे सौभाग्याचा सण. या दिवशी महिला आपल्या पतीसाठी व्रत करतात आणि वडाची पूजा करतात. वडाची पूजा करायला जाण्यासाठी छान तयारी करतात. पण, घरातील कामे करून व्यवस्थित तयारी करणे महिलांना शक्य होत नाही. त्याचबरोबर सर्वच महिलांना तयारी करायची असल्याने कोणाकडेच जास्त वेळ नसतो. अशावेळी स्वतःच्या हातानेच हेअरस्टाईल करायची हा पर्याय राहतो. तर तेव्हा स्वतःच्या हातानेच कोणत्या हेअरस्टाईल आपण करू शकतो, ते जाणून घेऊया.
1. 8 आकाराचा जुडा
8 आकाराचा जुडा बांधण्यासाठी तुम्हाला समोरून जशी हवी असेल तशी वेणी तुम्ही करू शकता. त्यानंतर मागे केसांची पोनी बांधून घ्यायची आहे. पोनी बांधल्यानंतर केसांना गुंडाळून घ्यायचं आहे. गुंडाळल्यानंतर त्याचा साधा गोल जुडा करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या जुड्यातील वरचा भाग हा वर सरकावून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला वरून यू पिन लावून सेट करायचं आहे. जुडा तयार झालेला असेल. त्यात तुम्ही गुलाबाचे फुल लावू शकता. अशा प्रकारे छान जुडा तयार होईल.
advertisement
2. 1 क्लचर वापरून हेअरस्टाइल
त्यासाठी केसांना दोन्ही साईडने करून घ्यायचे आहे. त्यानंतर केसांचा समोरील काही भाग कंगव्याच्या साहाय्याने वेगळा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला थोडे गुंडाळून वर पिन लावून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा तसंच करायचं आहे. त्यानंतर मागे आपल्याला केसांना क्लचर लावून घ्यायचा आहे. क्लचर लावून त्याला एखादे फुल लावू शकता. सोपी आणि आकर्षक हेअरस्टाईल तयार होईल.
advertisement
3. बन वापरून जुडा
त्यासाठी तुम्ही समोरील हेअरस्टाइल आधीप्रमाणे करू शकता. किंवा मग तुम्हाला पाहिजे तशी करू शकता. त्यानंतर मागील केसांची पोनी बांधून घ्यायची आहे. त्यानंतर बन त्या पोनीमध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर केस बनवर उलटे करून घ्यायचे आहे. उलटे केल्यानंतर त्यावर आणखी एक रबर बँड लावून घ्यायचा आहे. त्यानंतर उरलेल्या केसांचे रोल करून ते जुडाच्या साईडला यू पिन लावून सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित सेट झालं की त्यावर तुम्ही गोल गजरा लावू शकता. मधात गुलाबाचे फुल सुद्धा लावू शकता. छान जुडा तयार होईल.
advertisement
त्याचबरोबर तुम्हाला जर केस खुले सोडायचे असेल तर तुम्ही समोरील हेअरस्टाइल करून मागील केस खुले सोडू शकता. केसांच्या साईजनुसार तुम्ही यापैकी कोणतीही हेअरस्टाईल वटपौर्णिमेला करू शकता.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
June 09, 2025 12:02 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या दिवशी पार्लरमध्ये जायला वेळ नाही? घरीच करा सोप्या पद्धतीने हेअरस्टाईल, Video