Heart Attack : टीव्ही पाहिल्याने हार्ट अटॅक येतो? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
- Published by:Priya Lad
Last Updated:
Heart Attack Risk : टीव्ही पाहिल्याने डोळ्यांचे आजार होतात हे आपण सर्वांना माहिती आहे, पण यामुळे हार्ट अटॅकचाही धोका असतो हे तुम्हाला माहिती आहे का?
नवी दिल्ली : हार्ट अटॅकची बरीच कारणं आहेत. त्यापैकी काही कारणं आपल्याला माहिती आहेत तर काही माहिती नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे टीव्ही. टीव्ही पाहिल्याने डोळ्यांना त्रास होतो हे तुम्हाला माहिती असेल. पण टिव्हीमुळे तुम्हाला हार्ट अटॅकही येऊ शकतो. हे एका संशोधनात दिसून आलं आहे.
आज प्रत्येकजण आपला बहुतेक वेळ मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप सारख्या गॅझेट्सवर घालवतो. त्यांची शारीरिक हालचाल खूपच कमी झाली आहे. याचा रक्ताभिसरण आणि चयापचय दोन्हीवर परिणाम होत आहे आणि त्यामुळे लोक अनेक आजारांना बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत, एका नवीन अभ्यासात असा इशारा देण्यात आला आहे की जर आपण टीव्ही पाहणं कमी केलं नाही तर हृदयाशी संबंधित अनेक प्रकारचे आजार होतील. अमेरिकन हार्ट असोसिएशन जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे.
advertisement
या अभ्यासात असं म्हटलं आहे की जर तुम्ही टीव्ही किंवा मोबाईलवर घालवलेला वेळ कमी केला तर टाइप 2 मधुमेह आणि हृदयरोगांचा धोका खूप कमी होईल. जे लोक एक तासापेक्षा कमी वेळ टीव्ही पाहतात त्यांना टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो आणि यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो.
advertisement
अभ्यासाचे लेखक प्रोफेसर योंगवॉन किम म्हणाले की, टाइप 2 मधुमेहाचं मुख्य कारण एकाच जागी बराच वेळ बसणे आहे. बसून राहण्याची जीवनशैली हे याचं सर्वात मोठं कारण आहे. जेव्हा तुम्ही बराच वेळ टीव्ही पाहता किंवा मोबाईलवर काहीतरी पाहता तेव्हा तुम्ही बराच वेळ त्याच स्थितीत राहता. यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. मधुमेहामुळे हृदयरोगाचा धोका देखील वाढतो. म्हणून शक्य तितकं कमी टीव्ही पाहा.
advertisement
अभ्यासानुसार, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे एथेरोस्क्लेरोटिक हृदयरोग होतो. यामुळे कोरोनरी हृदयरोग, हृदयरोग, परिधीय धमनी रोग आणि एरोटिक एथेरोस्क्लेरोटिक रोग होतात. या परिस्थितीत, जर तुम्ही टीव्ही पाहणं कमी केलं तर या आजारांचा धोका कमी होईल. अनेक प्रकारचे अनुवांशिक धोके कमी होतील आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका देखील कमी होईल.
Location :
Delhi
First Published :
July 05, 2025 12:22 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Attack : टीव्ही पाहिल्याने हार्ट अटॅक येतो? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर